Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 7:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 मी आणखी एक देवदूत पूर्व दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते, त्यांना तो ओरडून म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने ओरडून म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मग दुसरा देवदूत पूर्वेच्या दिशेने हातात जिवंत परमेश्वराचा शिक्का घेऊन येताना मी पाहिला. पृथ्वीला व समुद्राला इजा करण्याचे काम ज्या चार देवदूतांवर सोपविले होते, त्या चार देवदूतांना तो ओरडून म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 7:2
29 Iomraidhean Croise  

शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचा पुत्र.”


तथापि येशू काही बोलला नाही. तेव्हा उच्च याजकांनी पुन्हा त्याला म्हटले, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.”


नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर शाश्वत जीवनासाठी, टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा. ते मनुष्याचा पुत्र तुम्हांला देईल; कारण परमेश्वर पित्याने त्याच्यावर मान्यतेचा शिक्का मारला आहे.”


त्याने आमच्यासाठी जे सर्व काही राखून ठेवले आहे, त्याची शाश्वती म्हणून आमच्या अंतःकरणात त्याने त्याचा आत्मा पाठवला आहे.


तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीचे शुभवर्तमान ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्यामध्ये ठसा उमटविण्यात आला आहे.


देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहां.


तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, याविषयी ते सर्व लोक बोलत आहेत. तसेच जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्याकरिता व


तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे: ‘आपले जे आहेत त्यांना प्रभू ओळखतो’ आणि ‘जो कोणी मी प्रभूचा आहे, असे म्हणतो त्याने अनीतीपासून दूर राहावे’.


पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, अगणित देवदूतांबरोबर उत्सव करणारा,


ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य आहेत कारण ह्या गोष्टी घडण्याची वेळ जवळ आली आहे.


मी आणखी एक सामर्थ्यशाली देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टित होता व त्याच्या डोक्याभोवती मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते.


त्या सात मेघगर्जनांचा अर्थ मी लिहिणार होतो, इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, “सात मेघगर्जनांचा अर्थ तू गुप्त ठेव, तो लिहू नकोस.”


सहाव्या देवदूताने आपली वाटी फरात महानदीवर ओतली तेव्हा पूर्वेकडून येणाऱ्या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून त्या महानदीचे पाणी आटून गेले.


“गुंडाळीवरचे शिक्के फोडून, ती उघडावयास कोण पात्र आहे”, असे मोठ्याने पुकारणारा एक सामर्थ्यशाली देवदूत मी पाहिला.


आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धूपपात्र होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धुपारती करण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता.


कर्णा असलेल्या सहाव्या देवदूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेवलेले चार देवदूत मोकळे कर.


त्यांना असे सांगण्यात आले होते की, पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या माणसांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan