Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 6:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 मग मी पाहिले, तो फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना पृथ्वीच्या चौथ्या भागावर तलवारीने, दुष्काळाने, रोगराईने व पृथ्वीवरील हिंस्र श्वापदांकडून माणसांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग मी पाहिले, तो एक फिकट रंगाचा ‘घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला, त्याचे नाव ‘मृत्यू’; आणि ‘अधोलोक’ त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना ‘तलवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना जिवे मारण्याचा’ अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 नंतर मी फिकट रंगाचा घोडा पाहिला. त्यावर जो बसलेला होता त्याचे नाव मरण होते; आणि मृतलोक त्याच्या पाठीमागून त्याच्याबरोबर चालला होता. त्यांना तलवारीने, दुष्काळाने, रोगाने व पृथ्वीवरील श्वापदांकडून मनुष्यांना जिवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मग मी एक फिकट रंगाचा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराचे नाव मृत्यू होते आणि अधोलोक त्याच्यामागून आला. पृथ्वीवरील एक चतुर्थांश लोकांना युद्ध, दुष्काळ, पीडा आणि हिंस्र पशूद्वारे ठार मारण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 6:8
26 Iomraidhean Croise  

आणि हे कफर्णहूमा, तुला आकाशापर्यंत चढवले जाईल काय? तुला नरकात फेकले जाईल! तू जे चमत्कार पाहिले ते सिदोनात घडले असते, तर ते नगर आजपर्यंत राहिले असते.


राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूकंप होतील व दुष्काळ पडतील.


अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे?


मी मृत्यू स्वीकारला होता तरी पाहा, मी युगानुयुगे जिवंत आहे. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत.


त्याच्या शेपटीने त्याने आकाशातील ताऱ्यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढले व ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला.


तेव्हा माणसांपैकी एक तृतीयांश माणसे ठार मारण्याकरता नेमलेली घटका, दिवस, महिना व वर्ष ह्यांसाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे करण्यात आले.


त्यांच्या तोंडांतून निघणारे अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे ठार मारली गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan