Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 3:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 मात्र ज्यांनी आपली वस्त्रे विटाळविली नाहीत, अशी थोडी माणसे सार्दीस येथे तुमच्यामध्ये आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील कारण तशी त्यांची योग्यता आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत, अशी थोडकी नावे सार्दीस येथे तुझ्याजवळ आहेत; ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तरी ज्यांनी आपली वस्त्रे मलीन केली नाहीत अशी थोडी नावे सार्दीसमध्ये तुझ्याजवळ आहेत, ते माझ्याबरोबर शुभ्र वस्त्रात चालतील कारण ते लायक आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मात्र ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत, असे थोडे लोक सार्दीस येथे तुमच्यामध्ये आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील कारण ते त्यास पात्र आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 3:4
31 Iomraidhean Croise  

ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल, त्या त्या ठिकाणी उचित व्यक्तीचा शोध घ्या आणि तुम्ही तेथून निघून जाईपर्यंत तेथेच राहा.


त्या कबरीच्या आत गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या.


परंतु त्या युगासाठी व मेलेल्यांतून पुनरुत्थान प्राप्त करून घेण्यासाठी जे योग्य ठरतील, ते लग्न करणार नाहीत व लग्न लावून देणार नाहीत.


तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व घडामोडी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”


काही दिवसांनंतर पेत्र सुमारे एकशे वीस श्रद्धावंतांच्या समुदायात उभा राहून म्हणाला,


हा सर्व देवाच्या यथार्थ न्यायाचा पुरावा आहे. तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात त्या देवाच्या राज्यासाठी तुम्ही पात्र ठरावे.


इतरांना अग्नीतून ओढून काढा व त्यांचे तारण करा आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र पापवासनेने डागाळलेली त्यांची वस्त्रे तुच्छ माना.


ती वाणी म्हणाली, “तुला जे दिसते, ते लिहून काढ आणि ते पुस्तक इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात ख्रिस्तमंडळ्यांना पाठव.”


त्याच घटकेस भीषण भूकंप झाला. तेव्हा त्या शहराच्या दहाव्या भागाचा विध्वंस झाला. भूकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीचे भयभीत होऊन त्यांनी स्वर्गातील देवाचा गौरव केला.


स्त्री संभोग टाळून शुद्ध राहिलेले ते हेच आहेत, ते ब्रह्मचर्य पाळणारे आहेत. जेथे कोठे कोकरू जाते, तेथे त्याच्यामागे जाणारे ते आहेत. ते देवासाठी व कोकरासाठी प्रथम फळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.


स्वर्गातील सैन्ये पांढऱ्या घोड्यांवर बसून स्वच्छ पांढरी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती.


तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे, ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत.


म्हणून मी तुला स्रा देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू शुद्ध सोने माझ्याकडून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.


जे विजय मिळवतील त्यांना अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करायला मिळतील. मी जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे मुळीच खोडणार नाही. माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर मी त्यांचा जाहीरपणे स्वीकार करीन.


राजासनाभोवती आणखी चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते.


तेव्हा त्या प्रत्येकाला एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आले, “तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे ठार मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या.”


ह्यानंतर शुभ्र झगे परिधान केलेले व हाती झावळ्या घेतलेले प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक आणि भाषा बोलणारे यांचे असंख्य लोक राजासनासमोर व कोकरासमोर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan