Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 3:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू थंड नाहीस व उष्ण नाहीस. तू थंड किंवा उष्ण असतास तर बरे झाले असते!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तुमची कृत्ये मला ठाऊक आहेत. तुम्ही थंड नाही व उष्ण नाही. तुम्ही थंड किंवा उष्ण असता तर बरे झाले असते!

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 3:15
23 Iomraidhean Croise  

जो माझ्यापेक्षा वडिलांवर किंवा आईवर अधिक प्रेम करतो, तो माझ्यासाठी योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो, तोही माझ्यासाठी योग्य नाही.


दुष्टपणा वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.


कोणीही मनुष्य दोन धन्यांची सेवा करू शकत नाही. तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची सेवा करू शकणार नाही.


श्रम करा; आळस करू नका. समर्पित वृत्तीने प्रभूची सेवा करा.


जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. आमच्या प्रभो, ये!


मला भीती वाटते की, मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे, तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही आणि तुमची अपेक्षा नाही, तसा मी तुम्हांला दिसून येईन. कदाचित भांडणतंटे, मत्सर, राग, स्वार्थी वृत्ती, निंदानालस्ती, गप्पाटप्पा, घमेंड व गैरवागणूक हे सारे मला आढळून येईल.


माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी.


बंधूंनो, आम्ही सर्वदा तुमच्याविषयी देवाचे आभार मानावयास हवेत आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुमच्या सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती वाढत आहे.


प्रांजल बंधुप्रेमासाठी तुम्ही स्वतःला सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहे म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.


तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर हे सारे मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची पारख केल्यामुळे ते खोटे आहेत, असे तुला दिसून आले.


परंतु तू पहिल्याप्रमाणे माझ्यावर प्रीती करीत नाहीस, ह्याविषयी तुला दोष देणे मला क्रमप्राप्त आहे.


सार्दीस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत, तो असे म्हणतो - तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस!


पण तू कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस किंवा थंड नाहीस. म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकणार आहे!


Lean sinn:

Sanasan


Sanasan