Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 22:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 तुमच्यासाठी ह्या गोष्टींविषयी घोषणा करण्याकरिता मी स्वतः येशूने माझ्या दूताला ख्रिस्तमंडळ्यांकडे पाठवले आहे. मी दावीदच्या घराण्याचे मूळ व वंशज आहे. मी तेजस्वी प्रभाततारा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ह्या गोष्टींविषयी तुम्हांला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळ्यांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा ‘अंकुर’ आहे व त्याचे संतानही; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 “तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “तू हे सर्व मंडळ्यांना सांगावे म्हणून मी येशूने, माझा दूत तुझ्याकडे साक्षीदार म्हणून पाठविला आहे. मी दावीदाचे मूळ व त्याचा वंश आहे. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 22:16
30 Iomraidhean Croise  

अब्राहामचा वंशज दावीद ह्याच्या कुळात जन्मलेल्या येशू ख्रिस्ताची वंशावळी:


“यहुदी लोकांचा राजा जन्मला आहे, तो कुठे आहे? आम्ही पूर्वेकडे त्याचा तारा पाहिला आणि आम्ही त्याची उपासना करायला आलो आहोत.”


“ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा वंशज आहे?” ते त्याला म्हणाले, “दावीदचा.”


दावीद स्वतः जर त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा पुत्र कसा?”


अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना त्याने प्रकाश द्यावा आणि आमच्या पायांना शांतीचा मार्ग दाखवावा म्हणून परमेश्वराच्या कोमल करुणेने उद्धाराची पहाट उगवेल.”


दावीद अशा प्रकारे त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?”


आणखी यशया पुन्हा म्हणतो, ‘इशायाचा वंशज उदयास येईल, तो यहुदीतरांवर अधिकार चालविण्याकरिता येईल, यहुदीतर त्याची आशा बाळगतील.’


महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ असून युगानुयुगे धन्य असा देव आहे. आमेन.


म्हणून आम्हांला अधिक खात्री वाटते की, संदेष्ट्यांचे वचन जे आमच्याजवळ आहे, ते काळोखात प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल, तर बरे होईल.


येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण:ज्या गोष्टी लवकरच जरूर घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्याने आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहान ह्याला हे कळविले.


ती वाणी म्हणाली, “तुला जे दिसते, ते लिहून काढ आणि ते पुस्तक इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात ख्रिस्तमंडळ्यांना पाठव.”


योहानकडून आशिया प्रांतातील सात ख्रिस्तमंडळ्यांना: जो आहे, जो होता व जो येणार त्याच्याकडून; त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्याकडून


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही.


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन, त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही माहीत होणार नाही.


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन.


नंतर त्या देवदूताने देवाच्या व कोकराच्या राजासनाकडून निघालेली, नगरीच्या मार्गावरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली.


दुराचारी माणूस दुराचार करो. गलिच्छ मनुष्य गलिच्छ राहो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो. सदाचारी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.”


ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, “खरोखर. मी लवकर येत आहे.” आमेन. ये, प्रभू येशू, ये!


नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना स्वतःचा पवित्र आत्मा देणारा देवप्रभू ह्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्याच्या सेवकांना कळविण्यासाठी त्याच्या दूताला पाठविले आहे.”


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत, त्याने ऐकून घ्यावे!


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत, त्याने ऐकून घ्यावे!


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकावे!


तेव्हा वडीलजनांच्या मंडळापैकी एक जण मला म्हणाला, “शोक करू नको, पाहा, यहुदाच्या वंशाचा सिंह, दावीदचे मूळ ह्याने जय मिळवला आहे म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास समर्थ ठरला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan