Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 21:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील, मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील; ‘मी त्याचा देव होईन, आणि तो माझा पुत्र होईल.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझी संतती होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 21:7
26 Iomraidhean Croise  

तसेच ज्याने घरे, भाऊ, बहिणी, वडील, आई, पत्नी, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत, त्याला शंभरपटीने मिळून शाश्‍वत जीवन वतन म्हणून प्राप्त होईल.


त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’


मग राजा त्याच्या उजवीकडच्यांना म्हणेल, “अहो, माझ्या पित्याचा आशीर्वाद लाभलेल्या लोकांनो, या. जे राज्य जगाच्या निर्मितीपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या.


तो बाहेर पडून रस्त्याने पुढे गेल्यावर एकाने धावत येऊन व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! शाश्वत जीवनाचे वतन मिळवता यावे म्हणून मी काय केले पाहिजे?”


जे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनुसार चालतात ते देवाचे पुत्र आहेत.


सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे.


देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत! स्वतः देवाने असे म्हटले आहे, मी त्यांच्यामध्ये निवास करून राहीन व त्यांच्यात फिरेन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.


मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व कन्या व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा: मी माझे नियम त्यांच्या मनावर ठसवीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन आणि मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील;


वाइटाबद्दल वाईट, शापाबद्दल शाप असे वागू नका, तर उलट आशीर्वाद द्या, आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे.


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही.


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन, त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही माहीत होणार नाही.


एवढेच करा की, जे तुम्हांला मिळाले आहे, ते मी येईपर्यंत दृढ धरून ठेवा.


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे, त्यावरचे फळ मी खावयास देईन.


मी राजासनाकडून आलेली उच्च वाणी ऐकली. ती अशी: “पाहा, आता देवाचा मंडप मनुष्यांमध्ये आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील, तो त्यांचा देव होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan