Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 20:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 मग मृत लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी गुंडाळ्या उघडल्या गेल्या, तेव्हा आणखी एक गुंडाळी उघडली गेली. ती जिवंत लोकांची होती. त्या गुंडाळ्यांमध्ये जे लिहिले होते त्यानुसार मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग मृत झालेल्या लहानथोरांना मी [देवाच्या] राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी ‘पुस्तके उघडली गेली;’ तेव्हा दुसरे एक ‘पुस्तक’ उघडले गेले ते ‘जीवनाचे’ होते; आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणे’ ठरवण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग मी मृतांना, लहान व मोठे ह्यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले; तेव्हा पुस्तके उघडली गेली; नंतर आणखी एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे पुस्तक होते; आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मग मृत झालेले लहान थोर परमेश्वराच्या आसनासमोर उभे असलेले मी पाहिले आणि पुस्तके उघडण्यात आली. आणखी एक पुस्तक उघडण्यात आले जे जीवनाचे पुस्तक होते. पुस्तकात लिहिल्यानुसार प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय करण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 20:12
34 Iomraidhean Croise  

परंतु मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा आधिक दया दाखवली जाईल


मनुष्याचा पुत्र त्याच्या पित्याच्या वैभवाने त्याच्या दूतांसह येईल त्या वेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.


तथापि भुते तुम्हांला वश होतात, ह्याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत, यात धन्यता माना.”


आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरतात, तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.


‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.’


म्हणून उचित समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची प्रशंसा करील.


कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपात प्रकट व्हावे लागते. प्रत्येकाने देहाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृत्यांचे फळ त्याला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर मिळावे.


तसेच हे माझ्या विश्वासू सहकाऱ्या, मी तुलाही विनंती करतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, असे माझे इतर सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले, त्यांना साहाय्य कर.


राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली आहेत, कारण तुझ्या क्रोधाची वेळ आली आहे. मृतांचा न्याय करण्याची वेळ आणि तुझे दास, संदेष्टे, तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीचा नाश करण्याऱ्यांचा विध्वंस करण्याची वेळ आली आहे!”


जगाच्या स्थापनेपासून ज्या कोणाची नावे वधलेल्या कोकराजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, त्यांना सोडून पृथ्वीवर राहणारे इतर सर्व जण त्या श्वापदाची आराधना करतील.


जे श्वापद तू पाहिले, ते अस्तित्वात होते परंतु आता नाही. ते अथांग विवरातून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना, ते श्वापद पूर्वी होते, आता नाही तरीही पुन्हा अवतरले, असे पाहून आश्चर्य वाटेल.


इतक्यात राजासनाकडून वाणी झाली, ती म्हणाली, “अहो, आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लाहनथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”


मी तिच्या अनुयायांना ठार मारीन, म्हणजे सर्व ख्रिस्तमंडळ्यांना कळून येईल की, मी मने व अंतःकरणे ह्यांची पारख करणारा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला मी ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईन.


नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या समोरून पृथ्वी व आकाश हे दोन्ही पळाले आणि ते पुन्हा दिसले नाहीत.


त्यानंतर समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर टाकले. मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्या हाती असलेल्या मृतांना बाहेर सोडले. आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला.


ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.


मात्र त्या नगरीत कोणत्याही निषिद्ध गोष्टी, अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा प्रवेश होणार नाही. ज्यांची नावे कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, असे लोकच ह्या नगरीत प्रवेश करतील.


येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास मी वेतन घेऊन येईन.


जे विजय मिळवतील त्यांना अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करायला मिळतील. मी जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे मुळीच खोडणार नाही. माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर मी त्यांचा जाहीरपणे स्वीकार करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan