Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 2:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

24 थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, तुम्हांला सैतानाच्या तथाकथित गहन गोष्टी माहीत नाहीत. मी तुम्हांला सांगतो की, मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्यांना सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत त्या तुम्हांला मी सांगतो की, मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरीत नाहीत त्यांना मी सांगतो की ज्यास सैतानाच्या खोल गोष्टी असे म्हणतात, त्या गोष्टी ज्यांना माहित नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24-25 थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाहीत व सैतानाच्या गहन गोष्टी शिकला नाहीत, मी तुम्हाला सांगतो, की मी तुमच्यावर अधिक ओझे लादणार नाही, फक्त मी येईपर्यंत तुमच्याजवळ जे आहे ते दृढ धरून राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 2:24
15 Iomraidhean Croise  

कारण पुढे दिलेल्या जरूरीच्या गोष्टींशिवाय तुमच्यावर जास्त ओझे लादू नये, असे पवित्र आत्म्याला व आम्हांला योग्य वाटले:


तेथे लुदिया नावाची एक स्त्री होती. ती थुवतीरा नगरची होती व जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.


परंतु देवाने ते पवित्र आत्म्याद्वारे आपल्यासाठी प्रकट केले, कारण पवित्र आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन हेतूंचा शोध घेतो.


सापाने कपट करून ज्याप्रमाणे हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे तुमची मने बिघडून ख्रिस्ताविषयी तुमची पूर्ण व शुद्ध आस्था भ्रष्ट होईल असे मला भय वाटते;


यात हेतू हा की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.


ही सुज्ञता वरून उतरत नाही, तर ती ऐहिक, अध्यात्माविरुद्ध व सैतानाकडली आहे.


ती वाणी म्हणाली, “तुला जे दिसते, ते लिहून काढ आणि ते पुस्तक इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात ख्रिस्तमंडळ्यांना पाठव.”


तो अवाढव्य अजगर खाली फेकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला तो प्राचीन साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांनाही टाकण्यात आले.


जी चिन्हे त्या पहिल्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून त्याने पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवले, म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदाची मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना त्याने फसवले.


सैतानाचे आसन आहे, तेथे तू राहतोस हे मला ठाऊक आहे. तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस. जेथे सैतान राहतो, तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा तुमच्यामध्ये ठार मारला गेला, त्या दिवसांतही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही.


थुवतीरा येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चकचकीत सोनपितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो -


तुझे क्लेश व तुझी गरिबी मला ठाऊक आहे. तरी तू धनवान आहेस. जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवितात पण केवळ सैतानाच्या समुदायात सामील आहेत, असे लोक जी निंदा करतात, ती मला ठाऊक आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan