Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 17:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 जे श्वापद तू पाहिले, ते अस्तित्वात होते परंतु आता नाही. ते अथांग विवरातून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिली नाहीत, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना, ते श्वापद पूर्वी होते, आता नाही तरीही पुन्हा अवतरले, असे पाहून आश्चर्य वाटेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 जे ‘श्वापद’ तू पाहिले ते होते आणि नाही; ते ‘अथांग डोहातून वर येणार’ आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ‘ज्यांची’ नावे ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिली’ नाहीत अशा पृथ्वीवर राहणार्‍या लोकांना, ते श्वापद होते, नाही, तरी हजर आहे असे पाहून आश्‍चर्य वाटेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आणि तू जो पशू बघितलास, जो होता आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील कारण तो होता, नाही आणि येणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तो पशू जो तुम्ही पाहिला होता, जो होता, पण आता नाही. तरी लवकरच तो अथांग कूपातून वर येईल आणि सार्वकालिक विनाशाकडे जाईल. पृथ्वीवरील लोकांपैकी ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, ते सर्व लोक पशूला पाहून थक्क होतील. जो पूर्वी होता, आता नाही, पण पुन्हा परत येणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 17:8
28 Iomraidhean Croise  

मग राजा त्याच्या उजवीकडच्यांना म्हणेल, “अहो, माझ्या पित्याचा आशीर्वाद लाभलेल्या लोकांनो, या. जे राज्य जगाच्या निर्मितीपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या.


तथापि भुते तुम्हांला वश होतात, ह्याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत, यात धन्यता माना.”


ती त्याला विनंती करीत होती, “आम्हांला अथांग विवरात जाण्याचा हुकूम देऊ नकोस.”


जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस म्हणून हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे, तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की, जे माझे वैभव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे.


हे जे त्याने युगादियुगाच्या सुरवातीपासून विदित केले आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.


आपण प्रीतीत त्याच्या समक्ष पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडून घेतले.


हे सत्य शाश्वत जीवनाच्या आशेवर आधारलेले असून सत्यवचनी परमेश्वराने काळाच्या प्रारंभापूर्वी ह्या जीवनाचे अभिवचन आम्हांला दिले


ज्याला जगाच्या स्थापनेपूर्वीपासून निवडण्यात आले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला.


त्यांनी साक्ष देण्याचे काम पूर्ण केल्यावर अथांग विवरातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यांना जिंकून ठार मारील.


जे श्वापद पूर्वी होते आणि आता नाही, तेच आठवे आहे. परंतु ते ह्या सातांचे आहे आणि त्याचा नाश होणार आहे.


तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्मरूपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले.


नंतर त्यांना ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा अगोदरच टाकण्यात आले होते. तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुगे पीडा भोगावी लागेल.


मग मृत लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी गुंडाळ्या उघडल्या गेल्या, तेव्हा आणखी एक गुंडाळी उघडली गेली. ती जिवंत लोकांची होती. त्या गुंडाळ्यांमध्ये जे लिहिले होते त्यानुसार मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला.


ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.


धीर धरण्याविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तूला राखीन.


जे विजय मिळवतील त्यांना अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करायला मिळतील. मी जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे मुळीच खोडणार नाही. माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर मी त्यांचा जाहीरपणे स्वीकार करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan