Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 14:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 स्त्री संभोग टाळून शुद्ध राहिलेले ते हेच आहेत, ते ब्रह्मचर्य पाळणारे आहेत. जेथे कोठे कोकरू जाते, तेथे त्याच्यामागे जाणारे ते आहेत. ते देवासाठी व कोकरासाठी प्रथम फळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकर्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 स्त्रीसंगाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याचे अनुसरण करणारे ते आहेत. मानवजातीतून खंडणी भरून मुक्त केलेले, हे देवाला व कोकऱ्याला प्रथमफळ असे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कारण त्यांनी स्वतःला शुद्ध राखलेले आहे आणि स्त्रीसंगाने ते मलीन झालेले नाहीत. जिथे कुठे कोकरा जातो, तिथे ते त्याच्यामागे जातात. त्यांना माणसातून विकत घेण्यात आले होते आणि परमेश्वराला व कोकर्‍याला प्रथमफळ म्हणून अर्पण केले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 14:4
32 Iomraidhean Croise  

कारण लग्न न करण्याची विविध कारणे आहेतः काही जणांची जन्मतःच अशी जडणघडण झालेली असते की, ते लग्न करू शकत नाहीत; काही जणांना माणसांनी तसे बदलले म्हणून लग्न करता येत नाही आणि इतर काही जण स्वर्गाच्या राज्यासाठी लग्न करत नाहीत. ज्याला हे स्वीकारता येते, त्याने स्वीकारावे.”


स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल. त्या त्यांचे दिवे घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या.


तेव्हा एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन.”


माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात.


जर कोणाला माझी सेवा करायची असेल, तर त्याने मला अनुसरणे आवश्यक आहे. म्हणजे जेथे मी आहे, तेथे माझा सेवकही असेल. जो कोणी माझी सेवा करतो, त्याचा सन्मान माझा पिता करील.


पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, मला आपल्यामागे आता का येता येणार नाही? आपल्यासाठी मी माझा प्राण द्यायला तयार आहे.”


येशू पुन्हा परुशी लोकांना म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


म्हणून तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला मेंढपाळ नेमले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी ख्रिस्तमंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे.


बंधुजनहो, तुम्हांला स्तेफनच्या घराण्याची माहिती आहे. ते अखया येथील प्रथम फळ आहे आणि त्याने स्वतःला पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे.


कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करा.


तथापि तू लग्न केलेस म्हणजे पाप केलेस, असे होत नाही. तसेच कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले, असेही होत नाही, मात्र अशांना ह्या जीवनात हालअपेष्टा भोगाव्या लागतील. अशा हालअपेष्टा तुम्हांला भोगाव्या लागू नयेत, अशी माझी इच्छा आहे.


तुमच्याविषयीची माझी ईर्ष्या देवाच्या ईर्ष्येसारखी आहे. मी फक्त एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की, तुम्हांला शुद्ध कुमारिका म्हणून ख्रिस्ताला सादर करावे.


हा पवित्र आत्मा आपल्या वारशाची हमी आहे व यामुळे आपल्याला खातरी बाळगता येते की, परमेश्वर त्याच्या स्वकीयांना खंडणी भरून मिळविलेली मुक्ती प्रदान करील. आपण त्याच्या वैभवाची स्तुती करू या!


म्हणजे त्याने तिला सर्व वैभवासह स्वत:ला सादर करावे. म्हणजेच ती शुद्ध व निर्दोष असावी; तिला सुरकुती किंवा इतर काही कलंक नसावा.


लग्न करावयाची ते मनाई करतील आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी कृतज्ञतेने ज्याचा उपभोग घ्यावयाचा, असे देवाने निर्माण केलेले खाद्य वर्ज्य करावे, असे सांगतील.


स्वर्गातील प्रथम जन्मलेल्यांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, परिपूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,


आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जणू काही प्रथम फळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला.


पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजेशाही याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही जाहीर करावेत.


ते कोकराबरोबर लढतील, परंतु कोकरू त्यांना जिंकील, कारण कोकरू प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू असे जे आहेत ते कोकराच्या बरोबर आहेत.”


त्या नगरीत माझ्या पाहण्यात मंदिर आले नाही, कारण सर्वसमर्थ प्रभू देव व कोकरू हेच तिचे मंदिर होय.


नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नव्हती, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली होती आणि कोकरू हेच तिचा दीप.


मात्र ज्यांनी आपली वस्त्रे विटाळविली नाहीत, अशी थोडी माणसे सार्दीस येथे तुमच्यामध्ये आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील कारण तशी त्यांची योग्यता आहे.


ते नवे गीत गात होते: “तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास पात्र आहेस, कारण तुझा वध करण्यात आला होता व तुझ्या बलिदानात्मक मृत्यूने तू सर्व वंश, भाषा बोलणारे, लोक आणि राष्ट्रे देवासाठी विकत घेतली आहेत


Lean sinn:

Sanasan


Sanasan