Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 13:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 त्याने देवनिंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक ह्यांची निंदा करण्यास सुरुवात केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक ह्यांची निंदा करण्यास तोंड सोडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्या पशूने देवाविरुद्ध त्याच्या नावाविषयी, त्याच्या मंडपाविषयी आणि स्वर्गात राहणाऱ्यांविषयी निंदा करायला आपले तोंड उघडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तो पशू परमेश्वराचे नाव, मंदिर व स्वर्गात निवास करणार्‍या सर्वांची निंदा करीत राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 13:6
26 Iomraidhean Croise  

अहो सापांच्या पिल्‍लांनो, तुम्ही दुष्ट असता, तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? अंतःकरणात जे भरून उरले आहे तेच मुखावाटे निघणार.


अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार आणि लैंगिक अनैतिकता, तसेच चोऱ्या, खोट्या साक्षी व निंदानालस्ती निघतात.


शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसती केली. आम्ही त्याचे वैभव पाहिले. ते पित्याकडून आलेल्या व कृपा आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या एकुलत्या एका पुत्राचे वैभव होते.


त्यांचे घसे उघड्या कबरीसारखे आहेत, त्यांच्या जिभा ते फसवण्याकरता वापरतात. त्यांच्या ओठांखाली सापांचे विष आहे.


कारण पित्याला हे आवडले की, त्याच्यामध्ये सर्व परिपूर्णता राहावी.


कारण ख्रिस्तामध्ये म्हणजेच त्याच्या मानवतेत देवपणाची सर्व पूर्णता वसते


पहिला मंडप तयार केलेला होता. त्यात दीपस्तंभ, टेबल व समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्र स्थान म्हटले आहे;


खऱ्या गोष्टीचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान; ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला


तेव्हा स्वर्गातून निघालेली उच्च वाणी त्यांनी त्यांच्याबरोबर बोलताना ऐकली, ती म्हणाली, “इकडे वर या.” मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत स्वर्गात वर गेले.


म्हणून स्वर्गांनो व त्यांत राहणाऱ्यांनो, आनंद करा!. भूमी व समुद्र ह्यांच्यावर अनर्थ ओढवला आहे, आपला काळ थोडा आहे, हे ओळखून सैतान अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.”


नंतर मी पाहिले, तेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीच्या मंडपामध्ये असलेले स्वर्गातील मंदिर उघडले


हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्या विनाशाविषयी आनंद करा, कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला न्याय मिळवून दिला आहे!”


मी राजासनाकडून आलेली उच्च वाणी ऐकली. ती अशी: “पाहा, आता देवाचा मंडप मनुष्यांमध्ये आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील, तो त्यांचा देव होईल.


ह्यानंतर मी पाहिले तो काय आश्चर्य! स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी कर्ण्याच्या ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन.”


राजासनाभोवती आणखी चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते.


स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रामध्ये जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात ह्यांना मी असे गाताना ऐकले, “राजासनावर बसलेल्याला व कोकराला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम युगानुयुगे असो!”


ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर उभे आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला त्यांच्याबरोबर वसती करील.


ह्यानंतर शुभ्र झगे परिधान केलेले व हाती झावळ्या घेतलेले प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक आणि भाषा बोलणारे यांचे असंख्य लोक राजासनासमोर व कोकरासमोर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan