Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 13:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 येथे सुज्ञतेचे काम आहे, ज्याला समज आहे, त्याने श्वापदाच्या संख्येचा अर्थ शोधून काढावा कारण संख्या माणसाच्या नावाचा बोध करते. त्याची संख्या सहाशे सहासष्ट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 येथे अकलेचे काम आहे; ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे; त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो; ती त्याची संख्या सहाशे सहासष्ट होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 येथे ज्ञानीपणच आहे; ज्याला बुद्धी असेल त्याने पशूच्या संख्येचा हिशोब करावा कारण, ती एका मनुष्याची संख्या आहे आणि त्याची संख्या सहाशे सहासष्ठ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 हे समजण्यासाठी सुज्ञतेची आवश्यकता आहे. कोणाजवळ अंतर्ज्ञान असेल, तर त्याने त्या पशूच्या संख्येचा हिशोब करावा, कारण ती एका मनुष्याच्या नावाची सांकेतिक संख्या आहे. ती संख्या 666 अशी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 13:18
10 Iomraidhean Croise  

मात्र जेथे ‘ओसाड अमंगल दुश्‍चिन्ह’ नसावे तेथे ते असलेले तुम्ही पाहालविाचकाने हे समजून घ्यार्वें तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे.


पण आपल्या अनीतीमुळे जर देवाचे नीतिमत्व स्थापन केले जाते, तर ह्याला आपण काय म्हणावे? देव जो क्रोधाने शासन करतो तो अनीतिमान आहे, असे म्हणावे की काय? (मी हे मानवी व्यवहारानुसार बोलत आहे.)


ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य आहेत कारण ह्या गोष्टी घडण्याची वेळ जवळ आली आहे.


मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले. श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळविलेले लोक हातात देवाने दिलेल्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.


येथे सुज्ञता व समज यांची गरज आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत. त्यांवर ती स्त्री बसते. ती डोकी म्हणजे सात राजेदेखील आहेत,


मग त्याने त्या नगरीच्या तटाचेदेखील माप घेतले. ते उंचीला साठ मीटर भरले. देवदूताच्या हाती असलेल्या प्रमाणभूत काठीने हे मोजमाप घेण्यात आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan