प्रकटी 13:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालविते आणि ज्या पहिल्या श्वापदाची प्राणघातक जखम बरी झाली होती, त्याची पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी आराधना करावी, असे ते दडपण आणते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्यासमक्ष चालवते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता, त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणार्या लोकांनी नमन करावे असे करते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तो पहिल्या पशूची सर्व सत्ता त्याच्यासमक्ष स्वतः चालवतो; ज्या पहिल्या पशूची जीवघेणी जखम बरी झाली होती त्यास पृथ्वीने व तीवर राहणाऱ्यांनी नमन करावे असे तो करतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 प्राणघातक जखम बरी झालेल्या त्या पहिल्या पशूच्या प्रतिनिधी सारखा सर्व अधिकार त्याने चालविला व सर्व जगास त्या पहिल्या पशूला नमन करविले. Faic an caibideil |
नंतर मी राजासने पाहिली, त्यावर कोणी बसले होते. त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना केली नव्हती आणि आपल्या कपाळांवर किंवा आपल्या हातांवर त्याची खूण धारण केली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यानी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.