Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 12:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 त्या वेळी अजगर व त्याचे दूत यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे स्थानही उरले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पुरेसे सामर्थ्य नसल्यामुळे युद्धात त्यांचा पराजय झाला आणि ते स्वर्गातील त्यांचे स्थान हरवून बसले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 12:8
18 Iomraidhean Croise  

आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी माझी मंडळी स्थापन करीन व तिच्यापुढे प्रत्यक्ष मृत्यूलोकाचेदेखील काहीच चालणार नाही.


हे सेवकपद व प्रेषितपद सोडून त्याच्या स्वतःच्या नेमलेल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे, असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडलास ते दाखव.”


ज्या देवदूतांनी आपल्या अधिकारपदाची मर्यादा न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतराच्या बंधनात निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे.


कोकराच्या रक्तामुळे व त्यांनी दिलेल्या सत्याच्या साक्षीमुळे तसेच त्यांच्यावर मरावयाची पाळी आली, तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही म्हणून आमच्या बंधूंना त्याच्यावर मात करता आली.


मग स्वर्गात युद्ध सुरू झाले, मीखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले.


तो अवाढव्य अजगर खाली फेकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला तो प्राचीन साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांनाही टाकण्यात आले.


नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या समोरून पृथ्वी व आकाश हे दोन्ही पळाले आणि ते पुन्हा दिसले नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan