Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 11:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 मी माझे दोन साक्षीदार पाठवीन आणि ते गोणपाट पांघरून त्या एक हजार दोनशे साठ दिवसांत संदेश घोषित करतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 माझे दोन साक्षी ह्यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना गोणपाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 11:3
43 Iomraidhean Croise  

“हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही जे चमत्कार घडलेले पाहिले ते सोर व सिदोन यांनी पाहिले असते, तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्चात्ताप केला असता.


परंतु त्याने जर ऐकले नाही, तर तू आणखी एका दोघांना आपणाबरोबर घे. अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध व्हावा


हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथ्सैदा, तुझीदेखील केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी सामर्थ्यशाली कृत्ये घडली ती सोर व सिदोन ह्यांत घडली असती, तर त्यांनी अगोदरच गोणपाट नेसून व राखेत बसून पश्‍चात्ताप केला असता व त्यांच्या पापांपासून परावृत्त झाल्याचे दाखवून दिले असते.


तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार आहात.


आणि तुम्हीही माझ्याविषयी साक्ष द्याल, कारण तुम्ही अगदी प्रारंभापासून माझ्याबरोबर आहात.”


योहानने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिेल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.


परंतु तुमच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झाल्यावर तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेममध्ये, सर्व यहुदियात, शोमरोनात व जगभर तुम्ही माझे साक्षीदार व्हाल.”


त्याच्याबरोबर जे गालीलहून यरुशलेम येथे आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे, ते आता इस्राएली लोकांसाठी त्याचे साक्षीदार आहेत.


ह्या येशूला देवाने उठविले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत.


तुम्ही जीवनाच्या अधिपतीला ठार मारले, पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले, ह्याचे आम्ही साक्षीदार आहोत.


देवाने ख्रिस्तमडंळीत प्रत्येकाला विशिष्ट जागी नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, त्यानंतर अद्भुत कृत्ये करणारे, आरोग्य देण्याचे कृपादान मिळालेले, साहाय्यक , नेतृत्व करणारे व अपरिचित भाषा बोलणारे असे नेमले आहेत.


ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक आरोप निश्‍चित करणे आवश्यक असते.’


आणि त्यानेच काहींना प्रेषित, काहींना संदेष्टे, काहींना शुभवर्तमानप्रचारक, काहींना पाळक व शिक्षक असे नेमले.


आणि विश्वसनीय साक्षीदार, मेलेल्यांमधून प्रथम उठविला गेलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपतीदेखील असलेला येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो; ज्याने स्वतःच्या रक्ताने आपल्याला पापांतून मुक्त केले आहे


मात्र मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस. कारण ते यहुदीतर लोकांना दिले आहे. ते लोक बेचाळीस महिने पवित्र नगरी तुडवतील.


त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यांना अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा आणि वाटेल तितक्यांदा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचा त्यांना अधिकार आहे.


ती स्त्री रानात पळून गेली. त्या ठिकाणी तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेली तिची एक जागा होती.


देवनिंदा करणारे अहंकारयुक्त दावे करण्याची त्याला मुभा देण्यात आली होती आणि बेचाळीस महिने त्याला अधिकार देण्यात आला होता.


तेव्हा मी त्याच्या पाया पडून त्याची आराधना करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, “तू असे मुळीच करू नकोस! मी तुझा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंचा दास आहे. देवाची आराधना कर, कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे.”


नंतर मी राजासने पाहिली, त्यावर कोणी बसले होते. त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना केली नव्हती आणि आपल्या कपाळांवर किंवा आपल्या हातांवर त्याची खूण धारण केली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यानी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan