Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 11:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उ्रास करतील व एकमेकांस भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस पीडा दिली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व ‘उल्लास करतील’ व एकमेकांना भेटी पाठवतील; कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणार्‍यांना पीडा दिली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील व एकमेकांना भेटी पाठवतील कारण त्या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस अतोनात पीडले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 उलट, आपला इतका छळ करणार्‍या या दोन संदेष्ट्यांच्या मृत्यूबद्दल सर्व जगभर लोक जागोजागी आनंदोत्सव करतील, एकमेकांना भेटी देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 11:10
29 Iomraidhean Croise  

माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल त्याचे तारण होईल.


मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल परंतु जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, परंतु तुमचे दुःख तुमचा आनंद होईल.


जग तुमचा द्वेष करू शकत नाही, पण ते माझा द्वेष करते कारण त्याची कृत्ये वाईट आहेत, अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो.


हे ऐकून न्यायसभेचे सदस्य संतापले आणि प्रेषितांना ठार मारण्याचा विचार करू लागले.


ती दुष्कृत्यात आनंद मानत नाही, तर सत्यात आनंद मानते.


आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत, असे पाहून अजगराने पुत्र प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला.


जी चिन्हे त्या पहिल्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून त्याने पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवले, म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदाची मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना त्याने फसवले.


जगाच्या स्थापनेपासून ज्या कोणाची नावे वधलेल्या कोकराजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, त्यांना सोडून पृथ्वीवर राहणारे इतर सर्व जण त्या श्वापदाची आराधना करतील.


पाचव्या देवदूताने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी वेदनांमुळे त्यांच्या जिभा चावल्या.


धीर धरण्याविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तूला राखीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan