प्रकटी 1:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 देवराज्याचे नागरिक म्हणून तुम्ही जो छळ धीराने सहन करीत आहात, त्या छळात मी, तुमचा बंधू योहान, येशूचा अनुयायी म्हणून सहभागी आहे. देवाचा शब्द व येशूने प्रकट केलेले सत्य जाहीर केल्याबद्दल मला पात्म बेटावर ठेवण्यात आले होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुमच्याबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्यांकरता पात्म नावाच्या बेटात होतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व सहनशीलता ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे, तो मी देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी योहान, तुमचा बंधू, येशूंच्या दुःखात, राज्यात व धीरात तुमचा सहभागी असलेला, परमेश्वराच्या वचनामुळे आणि येशूंच्या साक्षीमुळे पत्मोस नावाच्या बेटावर शिक्षा भोगीत होतो. Faic an caibideil |
नंतर मी राजासने पाहिली, त्यावर कोणी बसले होते. त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना केली नव्हती आणि आपल्या कपाळांवर किंवा आपल्या हातांवर त्याची खूण धारण केली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यानी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.