Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 1:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 आणि विश्वसनीय साक्षीदार, मेलेल्यांमधून प्रथम उठविला गेलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपतीदेखील असलेला येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो; ज्याने स्वतःच्या रक्ताने आपल्याला पापांतून मुक्त केले आहे

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आणि ‘विश्वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’ येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकांतून मुक्त केले,’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी जो मरण पावलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे आणि ज्या येशूने आमच्यावर प्रीती केली आणि ज्याने आपल्या रक्ताने आमच्या पापांतून आम्हास मुक्त केले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि जे विश्वसनीय साक्षीदार, मृतातील प्रथमफळ आणि पृथ्वीवरील राजांचे शासक आहेत त्या येशू ख्रिस्तापासून तुम्हास कृपा आणि शांती लाभो. त्यांना, जे आमच्यावर प्रीती करतात आणि ज्यांच्या रक्ताद्वारे आमची पापांपासून सुटका झाली आहे

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 1:5
53 Iomraidhean Croise  

जसे मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे, तर सेवा करायला व पुष्कळांसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”


तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.


ओलांडण सणापूर्वी असे झाले की, ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आता आली आहे, हे येशूने ओळखले. ह्या जगातील आप्तजनांवर त्याची जी प्रीती होती ती त्याने शेवटपर्यंत केली.


मी तुम्हांला एक नवीन आज्ञा देतो:तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा.


जसा पिता माझ्यावर प्रीती करतो, तसा मीही तुमच्यावर प्रीती करतो. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा.


तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे, असे आपण म्हणता. सत्याविषयी साक्ष द्यावी म्हणून माझा जन्म झाला आहे व ह्याकरता मी जगात आलो आहे. जो कोणी सत्याची बाजू घेतो तो माझी वाणी ऐकतो.”


मी तुम्हांला सत्य सांगतो, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो, परंतु तुम्ही आमची साक्ष मानत नाही.


कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला शाश्वत जीवन प्राप्त व्हावे.


जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे, त्याविषयी तो साक्ष देतो परंतु त्याची साक्ष कोणी मानत नाही.


म्हणून तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला मेंढपाळ नेमले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी ख्रिस्तमंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे.


त्या अशा की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि त्यानेच मेलेल्यांतून उठणाऱ्यांपैकी पहिला होऊन आमच्या लोकांना व यहुदीतरांनाही तारणाचा प्रकाश प्रकट करावा.”


त्याच्या आत्मबलिदानाद्वारे त्याने सर्वांसाठी क्षमा मिळवावी व ख्रिस्तावरील श्रद्धेने सर्वांनी ही क्षमा आपलीशी करावी म्हणून देवाने ख्रिस्त अर्पण केला. देवाने हे अशासाठी केले की, तो स्वतः नीतिमान आहे हे त्याला दाखवून द्यावयाचे होते. पूर्वी त्याने पापांकडे सहनशीलतेने व दयादृष्टीने पाहिले परंतु आता पापांच्या क्षमेसाठी तो त्याचे नीतिमत्व दाखवू इच्छितो. अशा प्रकारे तो दाखवून देतो की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात व हेच त्याचे नीतिमत्त्व आहे.


उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्यायोगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो!


आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही आता तुमच्या पापांपासून शुद्ध झाला आहात; तुम्ही स्वतःचे समर्पण देवाला केले आहे; आपल्या प्रभू ख्रिस्ताने व आपल्या देवाच्या आत्म्याने तुमचे देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित केले आहेत.


मला ख्रिस्ताबरोबर क्रुसावर चढविण्यात आले आहे आणि त्यामुळे ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आता देहामध्ये जे माझे जीवन आहे, ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता अर्पण केले.


परंतु देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या विपुल प्रीतीमुळे,


ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.


तो त्याच्या शरीराचे म्हणजे ख्रिस्तमंडळीचे मस्तक व उगमस्थान आहे. तो मृतांतून प्रथम जन्मलेला आहे. अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे;


सर्व प्राणिमात्रांना जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातसमक्ष स्वतःविषयी साक्ष दिली, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो,


जो धन्य व एकमेव अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही


तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडविले, ज्यामुळे तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो किती अधिक कठोर दंडास पात्र ठरेल?


तर सार्वकालिक आत्म्याच्यायोगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःला देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या उपासनेसाठी निरुपयोगी विधींपासून किती अधिक प्रमाणात शुद्ध करील?


तर निष्कलंक व निर्दोष कोकरू जो ख्रिस्त ह्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात.


पण जसा तो प्रकाशात आहे, तसे जर आपण प्रकाशात असलो, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते.


प्रीती म्हणावी तर हीच:आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हांवर प्रीती केली आणि तुम्हाआम्हांला पापांची क्षमा मिळावी म्हणून त्याच्या पुत्राला पाठविले.


सातव्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा स्वर्गात जोरदार आवाज ऐकू आले. ते म्हणाले, “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगानुयुगे राज्य करील!”


मी माझे दोन साक्षीदार पाठवीन आणि ते गोणपाट पांघरून त्या एक हजार दोनशे साठ दिवसांत संदेश घोषित करतील.”


ते कोकराबरोबर लढतील, परंतु कोकरू त्यांना जिंकील, कारण कोकरू प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू असे जे आहेत ते कोकराच्या बरोबर आहेत.”


त्यानंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो न्यायबुद्धीने न्यायनिवाडा करतो व लढतो.


त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू’ हे नाव लिहिलेले होते.


सैतानाचे आसन आहे, तेथे तू राहतोस हे मला ठाऊक आहे. तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस. जेथे सैतान राहतो, तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा तुमच्यामध्ये ठार मारला गेला, त्या दिवसांतही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही.


लावदिकीया येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षीदार जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण. तो असे म्हणतो -


मी त्याला म्हटले, “महाशय, हे तुम्हांला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या छळणुकीला सामोरे जाऊन येथे आले आहेत, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan