Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 1:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 त्याने त्याच्या उजव्या हातात सात तारे धरले होते, आणि त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्याचा चेहरा मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाइतका तेजस्वी होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा ‘परमतेजाने’ प्रकाशणार्‍या ‘सूर्यासारखी’ होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तलवार निघाली होती. त्याचा चेहरा दिवसाच्या अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्यांनी त्यांच्या उजव्या हातात सात तारे धरले होते आणि त्यांच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. त्यांचा चेहरा मध्यान्ह्याच्या सूर्यप्रकाशा इतका तेजस्वी होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 1:16
26 Iomraidhean Croise  

तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले. त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली.


तेव्हा महाराज, वाटेवर मध्यान्हसमयी सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा प्रकाश आकाशातून माझ्या व माझ्याबरोबर चालणाऱ्या माणसांच्या सभोवती चकाकताना मी पाहिला.


तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन हाती घ्या.


वास्तविक देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा धारदार असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचा न्याय करणारे असे आहे;


जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहतोस त्यांचे आणि सोन्याच्या त्या सात समयांचे गूज हे आहे:ते सात तारे हे सात ख्रिस्तमंडळ्यांचे दूत आहेत आणि सात समया ह्या सात ख्रिस्तमंडळ्या आहेत.”


मी आणखी एक सामर्थ्यशाली देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टित होता व त्याच्या डोक्याभोवती मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते.


नंतर स्वर्गात एक महान व रहस्यमय दृश्य दिसले. तिथे एक स्त्री दिसली. तिने सूर्यतेज पांघरलेले होते आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता.


त्याने राष्ट्रांवर वार करावा म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघाली. तो त्यांवर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ देवाच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवील.


त्यांची सैन्ये घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारली गेली आणि त्यांच्या मांसाने सर्व पक्षी तृप्त झाले.


इफिस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो व जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो -


पर्गम येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे, तो असे म्हणतो -


म्हणून पश्चात्ताप कर, नाही तर मी तुझ्याकडे लवकरच येऊन माझ्या तोंडातून निघणाऱ्या तलवारीने त्यांच्याविरूद्ध लढेन.


सार्दीस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत, तो असे म्हणतो - तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस!


Lean sinn:

Sanasan


Sanasan