Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण:ज्या गोष्टी लवकरच जरूर घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्याने आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहान ह्याला हे कळविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण : हे त्याला देवाकडून झाले. ‘ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या’ आपल्या दासांना दर्शवण्याकरता हे झाले; आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला कळवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ते देवाने ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या दासांना दाखविण्यासाठी ख्रिस्ताला दिले, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला कळविण्यास सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 ज्यागोष्टी लवकरच निश्चितच घडून येणार आहेत, त्या आपल्या सेवकांना दाखविण्यासाठी परमेश्वराने हे प्रकटीकरण येशू ख्रिस्ताला दिले. त्यांनी आपल्या दूताला पाठवून आपला सेवक योहानाला ते कळविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 1:1
30 Iomraidhean Croise  

कारण मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे


मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी माझ्या पित्याकडून ऐक ले, ते सर्व मी तुम्हांला सांगितले आहे.


जी वचने तू मला दिलीस, ती मी त्यांना दिली आहेत. ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्याकडून आलो, हे ते ओळखतात आणि तू मला पाठवले आहेस, असा ते विश्वास ठेवतात.


जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे, त्याविषयी तो साक्ष देतो परंतु त्याची साक्ष कोणी मानत नाही.


मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे. ज्याने मला पाठवले तो सत्य आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या त्याच मी जगापुढे जाहीर करतो.”


आपण देवाचा गौरव करू या. तुम्हांला तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास तो समर्थ आहे. येशू ख्रिस्ताविषयीचे जे शुभवर्तमान मी घोषित करतो त्यानुसार व जे रहस्य गत युगात गुप्त ठेवलेले होते, परंतु आता जे प्रकट करण्यात आले आहे त्यानुसार तो हे करीत आहे.


कारण ते मला मनुष्याकडून प्राप्त झाले नाही आणि ते मला कोणी शिकवलेही नाही तर येशू ख्रिस्ताने स्वतः ते मला प्रकट करून दाखवले आहे.


म्हणजे प्रकटीकरणाद्वारे मला रहस्य कळविले गेले, त्याप्रमाणे मी जे वर थोडक्यात लिहिले आहे,


देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी व त्यांना आपल्या धार्मिक सत्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला निवडण्यात व पाठविण्यात आले.


म्हणून जे तू पाहिले म्हणजेच जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव.


देवराज्याचे नागरिक म्हणून तुम्ही जो छळ धीराने सहन करीत आहात, त्या छळात मी, तुमचा बंधू योहान, येशूचा अनुयायी म्हणून सहभागी आहे. देवाचा शब्द व येशूने प्रकट केलेले सत्य जाहीर केल्याबद्दल मला पात्म बेटावर ठेवण्यात आले होते.


त्यानंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन मला म्हणाला, “इकडे ये, कुप्रसिद्ध वेश्येचा म्हणजेच अनेक नद्यांजवळ वसलेल्या महान नगरीचा न्यायनिवाडा होणार आहे, तो मी तुला दाखवितो.”


तेव्हा मी त्याच्या पाया पडून त्याची आराधना करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, “तू असे मुळीच करू नकोस! मी तुझा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंचा दास आहे. देवाची आराधना कर, कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे.”


तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”


तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजेच पवित्र नगरी, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती.


नंतर शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवदूतांपैकी एक देवदूत आला व म्हणाला, “ये, वधू म्हणजे कोकराची पत्नी मी तुला दाखवतो.”


नंतर त्या देवदूताने देवाच्या व कोकराच्या राजासनाकडून निघालेली, नगरीच्या मार्गावरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली.


तुमच्यासाठी ह्या गोष्टींविषयी घोषणा करण्याकरिता मी स्वतः येशूने माझ्या दूताला ख्रिस्तमंडळ्यांकडे पाठवले आहे. मी दावीदच्या घराण्याचे मूळ व वंशज आहे. मी तेजस्वी प्रभाततारा आहे.


नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना स्वतःचा पवित्र आत्मा देणारा देवप्रभू ह्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्याच्या सेवकांना कळविण्यासाठी त्याच्या दूताला पाठविले आहे.”


हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले, तेव्हा हे मला दाखविणाऱ्या देवदूताची आराधना करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो व त्याची आराधना करणार होतो.


परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. तू, संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. देवाची आराधना कर!”


ह्यानंतर मी पाहिले तो काय आश्चर्य! स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी कर्ण्याच्या ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन.”


त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan