Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 3:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 आपण खऱ्या अर्थाने सुंता झालेले, आत्म्याच्या प्रेरणेने देवाची आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद मानणारे व बाह्य गोष्टींवर भरवसा न ठेवणारे आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 कारण वास्तविक सुंता झालेले आपणच आहोत आणि जे आपणही आत्म्याद्वारे परमेश्वराची सेवा करतो व ख्रिस्त येशूंमध्ये अभिमान बाळगतो आणि देहावर भरवसा ठेवत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 3:3
32 Iomraidhean Croise  

मी जे काही सांगत आहे ते खरे आहे, ह्याविषयी देव माझा साक्षीदार आहे. त्याच्या पुत्राचे शुभवर्तमान घोषित करून मी देवाची मनापासून सेवा करीत आहे.


म्हणूनच ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या सेवेचा मी अभिमान बाळगू शकतो.


पण आता ज्याने आपण बद्ध होतो, त्यासंबंधाने मृत झाल्यामुळे आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, म्हणून जुन्या धर्मशास्त्रलेखास धरून नव्हे तर पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या नवजीवनाने आपण सेवा करतो.


भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही, तर ज्याच्यायोगे आपण “अब्बा, बापा!” अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.


उंची किंवा खोली, इतर कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करू शकणार नाही.


देवाचे वचन व्यर्थ झाले, असे मी म्हणत नाही, इस्राएल वंशांतले ते सर्व इस्राएली आहेत, असे नाही.


देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवणार.


आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे.


जितके लोक ह्या नियमाने वागतील तितक्या लोकांना व देवाच्या इस्राएलला शांती व दया मिळो.


परमेश्वराचे साहाय्य मागत ह्या सर्व गोष्टी प्रार्थना करून मागा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. ह्याकरिता जागृत राहून चिकाटी बाळगा; सर्व पवित्र जनांसाठी सातत्याने धावा करा.


फिलिप्पै येथील बिशप व दीक्षित सेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूमध्ये श्रद्धा असणाऱ्या सर्व पवित्र लोकांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथ्य ह्यांच्याकडून:


एवढ्यातच मी मिळवले आहे किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे, असा दावा मी करीत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला त्याचे म्हणून स्वीकारले, ते मी माझे करून घ्यावे म्हणून मी झटत आहे.


स्वर्गीय जीवनासाठी ख्रिस्ताद्वारे मिळणारे देवाचे उच्च पाचारण हे पारितोषिक प्राप्‍त करून घेण्यासाठी मी लक्ष्याकडे धावतो.


ख्रिस्तामध्ये तुमची सुंतादेखील झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर दैहिक पापी स्वभावापासून तुमची मुक्तता केल्याने ख्रिस्ताकडून झाली आहे.


प्रियजनहो, तुम्ही मात्र आपल्या परमपवित्र श्रद्धेवर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा,


Lean sinn:

Sanasan


Sanasan