Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 3:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 आपले नागरिकत्व मात्र स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा आपला तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 परंतु आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे आणि तिथून आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या परतण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 3:20
36 Iomraidhean Croise  

येशू त्याला म्हणाला, “तू पूर्ण होऊ पाहतोस तर जा. तुझे जे काही असेल ते विकून जे मिळेल ते गोरगरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि नंतर येऊन माझा शिष्य हो.”


जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो, परंतु देवाच्या दृष्टीने धनवान नाही त्याचे असेच आहे.”


म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करायला त्यांच्याजवळ काही नसेल. अर्थात, नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची परतफेड होईल.”


आणि ते म्हणाले, “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत उभे का राहिला आहात? हा येशू जो तुमच्यापासून वर स्वर्गात घेतला गेला तो, तुम्ही त्याला जसे वर जाताना पाहिले, तसाच पुन्हा येईल.”


परिणामी, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे तुम्ही कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत.


जे ऐहिक आहेत, ते मातीचे आहेत आणि जे स्वर्गीय आहेत, ते जो स्वर्गातला आहे त्याच्यासारखे आहेत.


आम्ही दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी शाश्वत आहेत.


आम्ही धैर्य धरतो आणि शरीराचा त्याग करून प्रभूबरोबर राहणे आम्ही पसंत करू..


परंतु स्वर्गीय यरुशलेम नगरी स्वतंत्र असून ती आपली माता आहे.


तर मग तुम्ही आत्तापासून परके व उपरे नाही, पवित्र लोकांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घराण्यातील लोक आहात.


आणि ख्रिस्त येशूमध्ये त्याने आपल्याला त्याच्याबरोबर स्वर्गलोकात राज्य करण्यासाठी उठविले.


जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे


सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकात्मतेने शुभवर्तमानावरील विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर आहात.


जेव्हा खरा संदेश म्हणजेच शुभवर्तमान प्रथम तुमच्याकडे पोहोचले, तेव्हा ही आशा तुमच्यासाठी स्वर्गात सुरक्षित राखून ठेवण्यात आली आहे.


त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्याकरिता तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात हे आपण होऊन ते तुमच्याविषयी सांगत आहेत. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठविले व तो आपल्याला देवाच्या भावी क्रोधापासून वाचविणारा आहे.


आज्ञेचा ध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तावर श्रद्धा ठेवून जे मेलेले आहेत, ते प्रथम उठतील.


आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी देवाबरोबरच्या नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू, न्यायप्रिय न्यायाधीश, न्यायाच्या दिवशी तो मुकुट मला देईल. तो केवळ मलाच नव्हे, तर जे त्याच्या प्रकट होण्याची प्रेमाने उत्कंठा बाळगतात, त्या सर्वांनाही देईल.


पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, अगणित देवदूतांबरोबर उत्सव करणारा,


त्याअर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापासंबंधी नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.


पाहा, तो मेघांवर आरूढ होऊन येत आहे! प्रत्येक जण त्याला पाहील. ज्यांनी त्याला भोसकले, तेही त्याला पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश शोक करतील. होय, असेच होईल. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan