Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 3:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 म्हणजे शक्य झाल्यास मृतांमधून मला पुनरुत्थान मिळावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणजे कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आणि कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान प्राप्त करून घ्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 3:11
17 Iomraidhean Croise  

म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करायला त्यांच्याजवळ काही नसेल. अर्थात, नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची परतफेड होईल.”


मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळी पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे.”


त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परुशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये आवेशाने म्हणाला, “बंधुजनहो, मी स्वतः एक परुशी व परुश्यांचा पुत्र आहे, आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.”


ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश, देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करत आहेत. महाराज, मी तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहुदी लोकांनी आरोप ठेवला आहे.


ते बंदर हिवाळ्यात राहावयाला सोयीचे नव्हते म्हणून बहुतेकांनी तेथून निघावे आणि साधेल तर फैनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा, अशी इच्छा प्रदर्शित केली. क्रेतमधील ह्या बंदराचे तोंड नैऋत्य व वायव्य दिशांकडे होते.


ह्यात माझा उद्देश असा आहे की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत, त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करावी व त्यांच्यांतील काहींना तारावे.


पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे:प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे आहेत, ते त्याच्या आगमनकाळी.


दुर्बलांना मिळवण्यासाठी मी दुर्बल झालो. मी सर्व प्रकारे कित्येक जणांचे तारण साधावे म्हणून मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे.


मी दुसऱ्यांना शर्यतीसाठी बोलावताना कदाचित मी स्वतः मात्र त्या स्पर्धेसाठी अपात्र ठरेन म्हणून मी माझ्या शरीराला कष्ट देऊन त्याला ताब्यात ठेवतो.


सापाने कपट करून ज्याप्रमाणे हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे तुमची मने बिघडून ख्रिस्ताविषयी तुमची पूर्ण व शुद्ध आस्था भ्रष्ट होईल असे मला भय वाटते;


ह्यामुळे मलाही आणखी धीर धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याकरिता तीमथ्यला पाठविले. सैतानाने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ होतील अशी मला भीती वाटली.


कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर अंतिम बंड पुकारले जाऊन तो अनाचारी प्रकट होईल.


आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी देवाबरोबरच्या नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू, न्यायप्रिय न्यायाधीश, न्यायाच्या दिवशी तो मुकुट मला देईल. तो केवळ मलाच नव्हे, तर जे त्याच्या प्रकट होण्याची प्रेमाने उत्कंठा बाळगतात, त्या सर्वांनाही देईल.


स्त्रियांना त्यांची मृत माणसे विश्वासामुळे पुनरुत्थान झालेली मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून स्वातंत्र्याचा त्याग करून हालअपेष्टा सोसल्या.


मृतांपैकी बाकीचे लोक, ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हे मृतांचे पहिले पुनरुत्थान.


Lean sinn:

Sanasan


Sanasan