Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 3:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अगोदर लिहिलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करण्यास मी कंटाळा करीत नाही, परंतु हे तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हांला लिहिण्यास मी कंटाळा करत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. तुम्हास पुन्हा लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्या सुरक्षितपणाचे आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बंधू व भगिनींनो, प्रभूमध्ये आनंद करा. त्याच गोष्टी तुम्हाला पुन्हा लिहिण्याचा मला त्रास होत नाही आणि हे तुमच्या संरक्षणासाठी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 3:1
46 Iomraidhean Croise  

आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.


व देव माझा तारणारा ह्याच्यामुळे माझा आत्मा उल्हसित झाला आहे,


इतकेच केवळ नव्हे, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण देवामध्ये अभिमान बाळगतो.


बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण होवो, तुम्हांला पूर्णता लाभो, माझ्या आवाहनांकडे लक्ष द्या. तुम्ही एकचित्त व्हा. शांतीने राहा म्हणजे प्रेमस्वरूप व शांतिदाता देव तुमच्यासोबत राहील.


शेवटी, प्रभूवरील निष्ठेत, त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा.


आपण खऱ्या अर्थाने सुंता झालेले, आत्म्याच्या प्रेरणेने देवाची आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये आनंद मानणारे व बाह्य गोष्टींवर भरवसा न ठेवणारे आहोत.


प्रभूमध्ये नेहमी आनंद करा, मी पुन्हा सांगतो, आनंद करा.


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, आनंददायक म्हणजेच जे उत्कृष्ट व शिफारसयोग्य आहे अशा गोष्टींचे मनन करा.


बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये विनंती व आवाहन करतो की, तुम्ही कसे वागून देवाला प्रसन्न करून घ्यावे हे तुम्ही आमच्याकडून ऐकून घेतले व तुम्ही खरोखर त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी;


सर्वदा आनंद करा.


माझ्या बंधूंनो, विविध प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना;


शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम जपणारे, कनवाळू व नम्र वृत्तीचे व्हा.


उलट, ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात, त्याअर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे वैभव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्‍लास व आनंद कराल.


प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हांला लिहिले आहे. ह्या दोन्ही पत्रांमध्ये मी तुम्हांला ह्या गोष्टींची आठवण देऊन तुमच्या मनामध्ये निर्मळ विचार जागृत करीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan