Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 2:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप घेऊन, मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 2:7
31 Iomraidhean Croise  

पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी प्रसन्न आहे, त्याच्यावर मी माझा आत्मा पाठवीन व तो परराष्ट्रीयांना माझा न्याय कळवील.


जसे मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे, तर सेवा करायला व पुष्कळांसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”


त्याने त्यांना उत्तर दिले, “एलिया प्रथम येऊन सर्व काही यथास्थित करतो हे खरे आहे, तरीदेखील मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावीत व त्याचा अव्हेर केला जावा, असे त्याच्याविषयी लिहिले आहे, त्याचा अर्थ काय?


मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? अर्थात, भोजनास बसणारा. मी मात्र तुमच्यामध्ये सेवा करणारा असा आहे.


शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वसती केली. आम्ही त्याचे वैभव पाहिले. ते पित्याकडून आलेल्या व कृपा आणि सत्य ह्यांनी परिपूर्ण असलेल्या एकुलत्या एका पुत्राचे वैभव होते.


येशू देहाने दावीदच्या वंशात जन्मला


ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, तर ‘तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली’, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे ते झाले.


कारण मी तुम्हांला सांगतो, परमेश्वर एकनिष्ठ आहे, हे दाखविण्यासाठी व पूर्वजांस दिलेली अभिवचने पूर्ण करण्यासाठी ख्रिस्त यहुदी लोकांचा सेवक झाला.


देहाच्या दुर्बलतेप्रमाणे नियमशास्त्र जे करू शकले नाही, ते देवाने केले. ह्यासाठी त्याने त्याचा पुत्र, पापमय देहासारख्या देहाने पाठवून, पाप दूर करण्यासाठी देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली.


कारण त्यास जरी दुर्बलतेत वधस्तंभावर चढविण्यात आले, तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्याप्रमाणे दुर्बल आहोत, परंतु तुमच्याबरोबरच्या आमच्या संबंधांत आम्ही त्याच्या जीवनात देवाच्या सामर्थ्याने संपन्न आहोत.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे.


परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.


तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही,


आपण आपला विश्वास उत्पन्न करणारा व पूर्ण करणारा येशू ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. जो आनंद त्याच्यापुढे होता, त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून क्रूस सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.


तुरुंगात पडलेल्यांबरोबर तुम्ही तुरुंगात आहात असे समजून त्यांची आठवण करा; आपणही देहात आहात म्हणून पीडितांची आठवण ठेवा.


आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan