Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 1:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक सद्भावनेने करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात; आणि कित्येक सद्भावाने करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही खरोखर सदिच्छेने करीत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 हे सत्य आहे की, काहीजण हेव्याने आणि वैरभावाने ख्रिस्ताचा प्रचार करतात, परंतु अन्य काही चांगल्या उद्देशाने करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 1:15
22 Iomraidhean Croise  

ते त्यांची सर्व कामे लोकांना दिसावीत म्हणून करतात. ते त्यांचे मंत्रपट्टे व त्यांच्या वस्त्रांच्या किनारी रुंद करतात.


येशू सर्वांचा प्रभू आहे व त्याच्याद्वारे देवाने शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करताना आपला जो संदेश इस्राएलच्या संततीस पाठवला तो तुम्हांला ठाऊक आहे.


परंतु कुप्र व कुरेनेकर येथील कित्येकांनी अंत्युखियात जाऊन प्रभू येशूचे शुभवर्तमान ग्रीक लोकांनाही सांगितले.


दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे, हे शुभवर्तमान घोषित करण्याचे त्यांनी चालू ठेवले.


फिलिपने बोलावयास आरंभ केला व ह्या धर्मशास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीचे शुभवर्तमान त्याला सांगितले.


फिलिपने शोमरोन येथील मुख्य शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली.


त्याने प्रार्थनामंदिरात येशूविषयी घोषणा करावयास त्वरित सुरुवात केली की, तो देवाचा पुत्र आहे.


परंतु जे स्वार्थी आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप हे येतील. दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहुदी आणि मग यहुदीतर, अशा प्रत्येकाच्या जिवाला वेदना व क्लेश होतील.


परंतु आम्ही तर क्रुसावर चढवलेला ख्रिस्त जाहीर करतो. हा संदेश यहुदी लोकांना न आवडणारा व ग्रीक लोकांना मूर्खपणा वाटेल असा आहे खरा,


मी माझे सर्व धन जरी अन्नदानार्थ दिले व माझे शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.


कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची जी घोषणा आमच्याकडून म्हणजे सिल्वान, तिमथ्य व माझ्याकडून, तुमच्यामध्ये झाली ती होय-नाही अशी नव्हती, तर त्याच्यामध्ये होय अशीच ठाम स्वरूपाची होती.


हे बढाई मारणारे तोतये प्रेषित, फसवेगिरी करणारे कामगार आणि ख्रिस्ताचे प्रेषित असल्याचे सोंग घेणारे आहेत.


मला भीती वाटते की, मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे, तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही आणि तुमची अपेक्षा नाही, तसा मी तुम्हांला दिसून येईन. कदाचित भांडणतंटे, मत्सर, राग, स्वार्थी वृत्ती, निंदानालस्ती, गप्पाटप्पा, घमेंड व गैरवागणूक हे सारे मला आढळून येईल.


कारण आम्ही स्वतःची घोषणा करत नाही. तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशूसाठी आम्ही तुमचे सेवक आहोत, अशी घोषणा आम्ही करतो.


काहींची मात्र तशी इच्छा होती. हे लोक श्रद्धावंत असल्याचे ढोंग करीत होते. ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, ते हेरून पाहण्यासाठी हे लोक गुप्तपणे आमच्या संघात सामील झाले होते. आम्ही पुन्हा गुलामगिरीत पडावे अशी त्यांची इच्छा होती.


स्वार्थी महत्त्वाकांक्षेने अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, परत स्वतःपेक्षा दुसऱ्यांना लीनतेने श्रेष्ठ माना.


आपल्या धर्माचे रहस्य निर्विवाद मोठे आहे: येशू देहात प्रकट झाला, पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची यहुदीतर लोकांत घोषणा झाली, जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो वर घेतला गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan