Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 8:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 आणि हेरोदचा कारभारी च्युजा ह्याची पत्नी योहान्ना, तसेच सुसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया होत्या. त्या आपल्या साधनसंपत्तीने त्यांची सेवा करीत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सूसान्ना व दुसर्‍या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हेरोदाचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना तसेच सूसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया, या आपल्या द्रव्याने त्यांची सेवा करीत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 हेरोदाचा घरगुती कारभारी खुजा, त्याची पत्नी योहान्ना, सुसान्ना व इतर अनेक स्त्रिया, स्वतःच्या मिळकतीतून त्यांना मदत करीत असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 8:3
19 Iomraidhean Croise  

त्या वेळी हेरोद राजाने येशूची कीर्ती ऐकली


हेरोदने त्याचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानला बांधून कैदेत टाकले होते;


पुढे हेरोदचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नृत्य करून हेरोदला खूष केले.


त्या घरात गेल्यावर ते बाळ त्याची आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिले. त्यांनी पाया पडून त्याची आराधना केली. त्यांच्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ह्या भेटवस्तू त्यांनी त्याला अर्पण केल्या.


संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “कामगारांना बोलाव आणि शेवटी आलेल्या कामगारापासून सुरुवात करून पहिल्यापर्यंत सर्वांना मजुरी दे.’


राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केले, त्याअर्थी ते माझ्यासाठी केले.’


गरीब नेहमी तुमच्याबरोबर असतील परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही.


तेथे पुष्कळ महिलादेखील हे दुरून पाहत होत्या. त्या येशूची सेवा करत गालीलहून त्याच्यामागे आल्या होत्या.


त्या स्त्रिया मरिया मग्दालिया, योहान व याकोबची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्याबरोबर ज्या दुसऱ्या होत्या, त्यांनीही हे वृत्त प्रेषितांना सांगितले.


त्याला गरिबांविषयी कळवळा होता म्हणून तो हे म्हणाला असे नव्हे तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पैशाची थैली होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला.


अंत्युखिया येथील ख्रिस्तमंडळीत बर्णबा, निग्र म्हटलेला शिमोन, लूक्य कुरेनेकर, हेरोद राज्यपालाच्या सहवासात वाढलेला मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे.


सर्व पवित्र जन व विशेषकरून राजघराण्यातील सर्व तुम्हांला शुभेच्छा पाठवितात.


शिवाय तिचे एकदाच लग्न झालेले असावे व सत्कृत्यांसाठी, मुलाबाळांचा सांभाळ, पाहुणचार, पवित्र लोकांची नम्र सेवा, संकटग्रस्तांना साहाय्य ह्यासाठी ती नावाजलेली असावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan