Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 10:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 त्याने त्यांना म्हटले, “पीक उदंड आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने त्याच्या पिकासाठी कामकरी पाठवावेत ह्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तो त्यांना म्हणाला, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडके आहेत, यास्तव पिकाच्या प्रभूने आपल्या पिकात कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यांनी त्यांना सांगितले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 10:2
48 Iomraidhean Croise  

स्वर्गाचे राज्य त्याच्या द्राक्षमळ्यात मजूर लावण्यासाठी पहाटे बाहेर पडलेल्या घरधन्यासारखे आहे.


प्रवासाला जात असलेल्या एका माणसाने आपले घर सोडताना आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपालास जागृत राहण्याची आज्ञा करावी, तसे हे आहे,


त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जाऊन सर्व लोकांना शुभवर्तमानाची घोषणा करा.


त्यांनी तेथून निघून शुभवर्तमानाची घोषणा सर्वत्र केली. त्या वेळी प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणाऱ्या चिन्हांद्वारे त्यांच्या संदेशाचे समर्थन करत होता.] प्रस्तुत शुभवर्तमानाचा शेवट एका प्राचीन हस्तलिखितात अशा प्रकारे केलेला आढळतो:


नंतर येशूने त्याच्या बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सर्व सामर्थ्य व अधिकार दिला.


स्तेफनवरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती, त्यांच्यापैकी काही जण फेनीके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून फक्त यहुदी लोकांना देवाचे वचन सांगत होते.


ते प्रभूची सेवा व उपवास करत असता पवित्र आत्मा म्हणाला, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.”


ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याद्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्र येथे गेले.


म्हणून तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला मेंढपाळ नेमले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी ख्रिस्तमंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे.


तेव्हा प्रभूने मला सांगितले, ‘जा, मी तुला यहुदीतरांकडे दूर पाठवतो.’”


ज्यांची पांगापांग झाली होती, ते श्रद्धावंत लोक तर शुभवर्तमान घोषित करीत चहूकडे फिरले.


देवाने ख्रिस्तमडंळीत प्रत्येकाला विशिष्ट जागी नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, त्यानंतर अद्भुत कृत्ये करणारे, आरोग्य देण्याचे कृपादान मिळालेले, साहाय्यक , नेतृत्व करणारे व अपरिचित भाषा बोलणारे असे नेमले आहेत.


तरी जो काही मी आहे, तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे, ती व्यर्थ झाली नाही. उलट त्या सर्वांपेक्षा मी अधिक श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले.


आम्ही देवाबरोबर कार्य करीत असता विनंती करतो की, तुम्ही केलेला त्याच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ जाऊ देऊ नका.


इतर सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात,


माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा निरोप्या तसेच माझ्या गरजेत माझा सेवक एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविणे मला आवश्यक वाटले;


माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली, ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.


त्याची जी शक्ती माझ्यामध्ये जोमाने कार्य करत आहे, तिच्या आधारे हे सिद्ध करण्यासाठी मी झटून श्रम करीत आहे.


ख्रिस्त येशूचा सेवक एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हांला शुभकामना पाठवतो. तो आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वदा तुमच्यासाठी आस्थेने विनंती करीत असतो की, त्याच्या इच्छेचे परिपूर्ण पालन करण्यासाठी प्रौढ व दृढनिश्चयी ख्रिस्ती म्हणून देवाने तुम्हांला स्थिर करावे.


बंधुंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे. तुमच्यातील कुणावर आमचा भार पडू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा केली.


बंधुंजनहो, आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूवरील श्रद्धेपोटी तुमच्यावर अधिकार चालवितात व तुम्हांला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा;


बंधुजनहो, आता इतकेच सांगणे आहे की, आमच्यासाठी प्रार्थना करत जा, ज्यामुळे तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या संदेशाचा त्वरेने प्रसार व्हावा व तो सन्मानाने स्वीकारला जावा.


आम्ही झगडतो व श्रम करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा, तारणारा आहे, त्या जिवंत देवाची आम्ही वाट पाहत आहोत.


परंतु तू सर्व गोष्टींविषयी सावध रहा, दुःखे सोस, शुभवर्तमान प्रचारकाचे सेवाकार्य कर व तुझ्याकडे सोपविलेली पूर्ण जबाबदारी देवाचा सेवक म्हणून पार पाड.


आमचा प्रिय सहकारी फिलेमोन, तुझ्या घरात जमणारी ख्रिस्तमंडळी, आमची भगिनी अफ्फिया व आमचा सहसैनिक अर्खिप्प, तुम्हां सर्वांना


ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता. आपल्या आशेसंबंधी धैर्य व आत्मविश्वास यांमध्ये पारपर्यंत टिकून राहिल्यास आपण देवाचे घर आहोत.


इफिस येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो व जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो -


Lean sinn:

Sanasan


Sanasan