Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 प्रिय थियफील, आपल्यामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतान्त लिहिण्याचे काम अनेक लोकांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ज्या गोष्टींसंबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खातरी झाली आहे, त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 ज्या गोष्टींची आम्हास पक्की खातरी आहे त्या गोष्टी जे प्रारंभापासून प्रत्यक्ष पाहाणारे व शब्दाचे सेवक होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आम्हामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतांत संग्रहित करण्याचे काम अनेकांनी हाती घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 1:1
13 Iomraidhean Croise  

त्यांनी तेथून निघून शुभवर्तमानाची घोषणा सर्वत्र केली. त्या वेळी प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणाऱ्या चिन्हांद्वारे त्यांच्या संदेशाचे समर्थन करत होता.] प्रस्तुत शुभवर्तमानाचा शेवट एका प्राचीन हस्तलिखितात अशा प्रकारे केलेला आढळतो:


परंतु हे जे लिहिले आहे ते अशाकरता की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्‍वासाद्वारे त्याच्या नावात तुम्हांला जीवन प्राप्त व्हावे.


कोणी माणूस एखादा दिवस दुसऱ्या दिवसांपेक्षा अधिक श्रेयस्कर मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी.


देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे, अशी त्याची पक्की धारणा होती.


ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रीतीने एकमेकांना ते जोडले जावेत, ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाच्या, म्हणजे पित्याच्या व ख्रिस्ताच्या रहस्याचे, पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे.


ख्रिस्त येशूचा सेवक एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हांला शुभकामना पाठवतो. तो आपल्या प्रार्थनेमध्ये सर्वदा तुमच्यासाठी आस्थेने विनंती करीत असतो की, त्याच्या इच्छेचे परिपूर्ण पालन करण्यासाठी प्रौढ व दृढनिश्चयी ख्रिस्ती म्हणून देवाने तुम्हांला स्थिर करावे.


आमचे शुभवर्तमान केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खातरीने तुम्हांला कळविण्यात आले. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो, हे तुम्हांला ठाऊक आहे.


आपल्या धर्माचे रहस्य निर्विवाद मोठे आहे: येशू देहात प्रकट झाला, पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची यहुदीतर लोकांत घोषणा झाली, जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो वर घेतला गेला.


परंतु प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व यहुदीतरांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला मृत्युदंडापासून वाचविले.


म्हणून आपली हृदये शिंपडली गेल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण शाश्वतीने देवाच्या जवळ येऊ.


आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने आपली आस्था शेवटपर्यंत टिकवून ठेवावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan