Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 3:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 येशू त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 3:3
32 Iomraidhean Croise  

येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, तू धन्य आहेस; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे.


मी पुन्हा तुम्हांला सांगतो, धनवानाने देवाच्या राज्यात जाणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.”


ह्या दोघांतून कोणी त्याच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे केले?” ते म्हणाले, “धाकट्या मुलाने.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या आधी देवाच्या राज्यात जात आहेत.


मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, आकाश व पृथ्वी नाहीशी होईपर्यंत व सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा नाहीशी होणार नाही.


ते पाहून येशूला राग आला. तो त्यांना म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या. त्यांना अडवू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचे आहे.


तुझा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. दोन डोळे असून जेथे किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एका डोळ्याने देवाच्या राज्यात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.


त्यांचा जन्म रक्त, किंवा देहवासना, किंवा मनुष्याची इच्छा, ह्यांच्यामुळे झाला नाही, तर देवाकडून झाला.


तो प्रकाश अंधारात प्रकाशतो व अंधाराने त्याला ग्रासले नाही.


आणखी येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, स्वर्ग उघडलेला आणि देवदूतांना वर चढताना व मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.”


त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, माझ्याकडे वळू नये व मी त्यांना बरे करू नये, म्हणून देवाने त्यांचे डोळे आंधळे व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.


निकदेम त्याला म्हणाला, “वयात आलेला मनुष्य पुन्हा कसा जन्म घेऊ शकेल? त्याला दुसऱ्यांदा मातेच्या उदरात जाणे व जन्म घेणे शक्य आहे काय?”


त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची तंतोतंत प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या वैभवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये.


जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल, तर तो नवी निर्मिती आहे. जुने ते होऊन गेले, पाहा, सर्व काही नवीन झाले आहे.


सुंता करणे किंवा न करणे याला काही अर्थ नाही परंतु नवी उत्पत्ती हेच सर्व काही आहे.


तुम्ही आपले अपराध व आपली पापे ह्यांमुळे पूर्वी मृत झाला होता.


तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेनुसार त्याने आपले तारण केले, पवित्र आत्म्याद्वारे मिळालेले नव्या जन्माचे स्नान व त्याने केलेले नूतनीकरण ह्यांमधून अभिव्यक्त झाले.


परंतु वरून येणारी सुज्ञता ही मुळात शुद्ध असते. शिवाय ती शांतिप्रिय, सौम्य व स्नेहवर्धक असते; ती करुणायुक्त असून तिला सत्कृत्यांचे पीक येते; ती पक्षपात व ढोंगबाजी यांपासून अलिप्त असते


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! त्याच्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून झालेल्या पुनरुत्थानाद्वारे त्याने आपल्याला नवजीवन दिले. हे आपले अंतःकरण जिवंत आशेने भरून टाकते.


तो नीतिमान आहे, हे जर तुम्हांला माहीत आहे, तर मग जो कोणी नीतीने चालतो, तो त्याच्यापासून जन्मलेला आहे, हेही तुम्हांला माहीत झाले असावे.


जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, कारण देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते. तो पाप करू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे.


येशू हा ख्रिस्त आहे, असा विश्वास जो कोणी धरतो, तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी पित्यावर प्रीती करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो.


जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मलेला आहे, त्याला देवपुत्र ख्रिस्त सुरक्षित ठेवतो आणि सैतान त्याला उपद्रव करू शकत नाही.


जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर जय मिळवतो आणि जगावरील जय म्हणजेच आपली श्रद्धा.


लावदिकीया येथील ख्रिस्तमंडळीच्या देवदूताला लिही: जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षीदार जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण. तो असे म्हणतो -


Lean sinn:

Sanasan


Sanasan