Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




याकोब 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 बारा वंशांतील जगभर पांगलेल्या सर्व लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक याकोब ह्याच्या शुभेच्छा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बारा वंशांतील पांगलेल्या लोकांना, देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब ह्याचा सलाम.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून, राष्ट्रांमध्ये पांगलेल्या बारा वंशाना, शुभेच्छा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




याकोब 1:1
41 Iomraidhean Croise  

फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय जकातदार; अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय,


हा सुताराचा मुलगा ना? मरिया ह्याची आई ना? याकोब, योसे, शिमोन व यहुदा हे ह्याचे भाऊ ना?


येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, नव्या उत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल, तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल.


अंद्रिया, फिलिप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी


तुम्ही माझ्या राज्यात माझ्या टेबलावर खाल व प्याल आणि राजासनांवर बसून इस्राएलच्या बारा वंशांचा न्याय कराल.”


मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, राष्ट्रवादी शिमोन,


जर कोणाला माझी सेवा करायची असेल, तर त्याने मला अनुसरणे आवश्यक आहे. म्हणजे जेथे मी आहे, तेथे माझा सेवकही असेल. जो कोणी माझी सेवा करतो, त्याचा सन्मान माझा पिता करील.


ह्यामुळे यहुदी आपसात म्हणाले, “हा असा कुठे जाणार आहे की, तो आपल्याला सापडणार नाही? ज्या ग्रीक शहरांत आपल्या लोकांची पांगापांग झालेली आहे, तेथे जाऊन हा ग्रीक लोकांना शिकवणार की काय?


आणि ज्या माडीवरच्या खोलीत पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, राष्ट्रवादी शिमोन व याकोबचा मुलगा यहुदा हे राहत होते त्या ठिकाणी ते गेले.


त्याने हाताने त्यांना खुणावून गप्प राहायला सुचवून आपणाला प्रभूने कसे बाहेर काढले, हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले, “हे याकोबला व बंधुजनांना सांगा.” नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला.


त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला, “बंधुजनहो, माझे ऐका.


कारण प्राचीन काळापासून दर साबाथ दिवशी प्रार्थनास्थळी मोशेचे शब्द वाचून दाखवून त्यांची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.”


त्यांच्या हाती त्यांनी असे पत्र लिहून पाठवले: अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील यहुदीतरांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा नमस्कार.


त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातून आलेले यहुदी लोक यरुशलेममध्ये राहत होते.


दुसऱ्या दिवशी पौल आमच्याबरोबर याकोबच्या घरी आला. सर्व वडीलजनही तेथे आले.


महाराज फेलिक्स राज्यपाल ह्यांस, क्लौद्य लुसिया ह्याचा नमस्कार,


ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश, देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करत आहेत. महाराज, मी तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहुदी लोकांनी आरोप ठेवला आहे.


शौलाला तर स्तेफनचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेम येथल्या मंडळींचा फार छळ झाला. प्रेषितांखेरीज इतर सर्वांची यहुदिया व शोमरोन या प्रदेशात पांगापांग झाली.


ख्रिस्त येशूचा सेवक आणि देवाने शुभवर्तमान घोषित करण्याकरिता निवडलेला व पाचारण केलेला प्रेषित पौल ह्याच्याकडून:


प्रभूचा बंधू याकोब याच्याशिवाय प्रेषितांपैकी इतर कोणाची माझी भेट झाली नाही.


कारण याकोबकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो यहुदीतर लोकांच्या पंक्तीत बसत असे, परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला.


मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, पेत्र व योहान हे जे आधारस्तंभ असे मानले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आम्ही यहुदीतर लोकांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे आणि आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे.


फिलिप्पै येथील बिशप व दीक्षित सेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूमध्ये श्रद्धा असणाऱ्या सर्व पवित्र लोकांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथ्य ह्यांच्याकडून:


होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया व सर्व बंधू तुला शुभेच्छा कळवितात.


देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी व त्यांना आपल्या धार्मिक सत्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला निवडण्यात व पाठविण्यात आले.


येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्या प्रांतांत हद्दपार केलेल्या, देवाच्या निवडलेल्या लोकांना:


येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून: आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना,


देवपित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्ताच्या संरक्षणाखाली असलेले व देवाने आमंत्रित केलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा सेवक व याकोबचा बंधू यहूदा ह्याच्याकडून:


ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्त्राएली लोकांच्या बारा वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan