Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 4:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 त्याचप्रमाणे आपणही अल्पवयीन होतो, तेव्हा आपणदेखील ह्या विश्वातील सत्ताधिकारी आत्म्यांच्या गुलामगिरीत होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 अशाप्रकारे आपणदेखील बाळ असताना, आपण जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जेव्हा आम्ही बालक होतो, तेव्हा आम्ही जगाच्या आत्मिक तत्वांच्या दबावाखाली होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 4:3
20 Iomraidhean Croise  

अहो कष्ट करणाऱ्यांनो व ओझ्याखाली दबलेल्यांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.


नंतर ज्या यहुदी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात टिकून राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात.


असे असताना जे जोखड आपले पूर्वज व आपणही वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता?


आपणाला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मी मात्र मर्त्य मानव असून पापाला गुलाम म्हणून विकलेला आहे,


भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही, तर ज्याच्यायोगे आपण “अब्बा, बापा!” अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.


कोणी तुमच्यावर सत्ता चालविली किंवा तुमचा गैरफायदा घेतला किंवा कोणी तुमच्याविरुद्ध डावपेच रचले किंवा तुम्हांला हीन लेखले किंवा कोणी तुमच्या थोबाडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.


काहींची मात्र तशी इच्छा होती. हे लोक श्रद्धावंत असल्याचे ढोंग करीत होते. ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, ते हेरून पाहण्यासाठी हे लोक गुप्तपणे आमच्या संघात सामील झाले होते. आम्ही पुन्हा गुलामगिरीत पडावे अशी त्यांची इच्छा होती.


नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन देण्यात आले होते, त्या संतानाच्या आगमनापर्यंत नियमशास्त्र हे उ्रंघनाच्या संदर्भात देण्यात आले होते. ते एका मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांद्वारे देण्यात आले.


बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन असतो.


ह्या गोष्टी दृष्टान्तरूप आहेत, त्या दोन स्त्रिया म्हणजे दोन करार होत, एक स्त्री म्हणजे हागार. हिची मुले गुलामगिरीत जन्मला आली. सीनाय पर्वतावर केलेल्या कराराची ती प्रतिनिधी आहे.


हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वताचा निर्देश करते आणि ह्रीची यरुशलेम नगरी तिच्यासारखी आहे. ती आपल्या मुलांबाळासह गुलामगिरीत आहे.


म्हणून बंधुजनहो, आपण दासीची मुले नाही, तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.


पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता आणि त्यामुळे जे वस्तुतः देव नाहीत, त्यांचे तुम्ही गुलाम होता.


परंतु आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बल व हीन दर्जाच्या दैवतांकडे पुन्हा कसे वळता? त्यांचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा का बाळगता?


तुम्ही ख्रिस्ताबरोबर मृत झाला आहात व विश्वाच्या सत्ताधिकारी आत्म्यांपासून तुमची मुक्तता करण्यात आली आहे. तर मग तुम्ही या जगाचे विधिनियम पाळत अशा प्रकारे जीवन का जगता?


ख्रिस्ताकडून नव्हे तर मानवी परंपरांकडून व विश्वावर सत्ता चालविणाऱ्या आत्म्यांकडून येणाऱ्या मानवी शहाणपणाच्या निरर्थक भूलथापांनी तुम्हांला कोणी गुलामगिरीत टाकू नये म्हणून सावध राहा;


वास्तविक एवढ्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होते, पण तुम्हांला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकविण्याची जरुरी आहे आणि तुम्हांला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan