Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 6:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 हे लक्षात ठेवा की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तो प्रभूच्या पारितोषिकास पात्र ठरतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कारण तुम्हांला माहीत आहे की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो, तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्यास प्रतिफळ प्राप्त होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तुम्ही दास किंवा स्वतंत्र असला, तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीचे वेतन प्रभू तुम्हा प्रत्येकाला देईल, हे लक्षात ठेवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 6:8
20 Iomraidhean Croise  

मनुष्याचा पुत्र त्याच्या पित्याच्या वैभवाने त्याच्या दूतांसह येईल त्या वेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.


ते त्याला म्हणाले, “आम्हांला कोणी कामावर घेतले नाही.” त्याने त्यांना म्हटले, “तुम्हीही द्राक्षमळ्यात कामाला जा.’


आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.


माणसांना दिसावे म्हणून त्यांच्यापुढे तुमचे धर्माचरण न करण्याची तुम्ही काळजी घ्या, नाही तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हांला पारितोषिक मिळणार नाही.


तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.


म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करायला त्यांच्याजवळ काही नसेल. अर्थात, नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची परतफेड होईल.”


तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. त्यांचे बरे करा. परतफेडीची अपेक्षा न करता उसने द्या म्हणजे तुम्हांला महान पारितोषिक मिळेल आणि तुम्ही परमेश्वराची मुले व्हाल कारण कृतघ्न व वाईट लोकांनाही तो त्याचा चांगुलपणा दाखवतो.


त्याचप्रमाणे आपण यहुदी असू किंवा ग्रीक असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने अभिषिक्त झालो आहोत.


कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपात प्रकट व्हावे लागते. प्रत्येकाने देहाने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृत्यांचे फळ त्याला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर मिळावे.


यहुदी व ग्रीक, गुलाम व स्वतंत्र, स्त्री व पुरुष, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूमध्ये एक आहात.


परिणामी, ग्रीक व यहुदी, सुंता झालेला व न झालेला, रानटी व स्कुथीपंथीय, गुलाम व स्वतंत्र असा भेद उरला नाही. तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वांत आहे.


प्रभूकडून वतनरूप पारितोषिक तुम्हांला मिळेल, हे तुम्हांला माहीत आहे, कारण प्रभू ख्रिस्त तुमचा खरा धनी आहे


आणि अन्याय करणाऱ्याची त्याने केलेल्या अन्यायाबद्दल परतफेड केली जाईल; कारण देव पक्षपात करत नाही.


म्हणून आपला आत्मविश्‍वास सोडू नका, त्याचे फळ मोठे आहे.


ख्रिस्तासाठी विटंबना सोसणे ही इजिप्त देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती, आहे असे त्याने मानले; कारण त्याची दृष्टी भावी फलप्राप्तीवर होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan