Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 5:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणार्‍या लोकांवर देवाचा कोप होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 पोकळ शब्दांनी कोणी तुम्हाला फसवू नये, या गोष्टींमुळे आज्ञाभंग करणार्‍यांवर परमेश्वराचा क्रोध भडकतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 5:6
28 Iomraidhean Croise  

कारण खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून महान चिन्हे व अद्भुते दाखवतील.


येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध असा.”


कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे पुढे येतील आणि शक्य झाले तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून चिन्हे व अद्भुत गोष्टी दाखवतील.


येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.


जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अधार्मिकपणावर व दुष्टपणावर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट झाला आहे.


आपल्याला झालेल्या खास दृष्टान्तामुळे जो खोट्या नम्रतेचा व देवदूतांच्या उपासनेचा आग्रह धरीत असतो अशा माणसाला तुम्हांला दोषी ठरवू देऊ नका. असा मनुष्य विनाकारण मानवी विचारसरणीने गर्वाने फुगलेला असतो.


लाघवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून मी हे तुम्हांला सांगतो. जरी मी देहाने दूर असलो,


ख्रिस्ताकडून नव्हे तर मानवी परंपरांकडून व विश्वावर सत्ता चालविणाऱ्या आत्म्यांकडून येणाऱ्या मानवी शहाणपणाच्या निरर्थक भूलथापांनी तुम्हांला कोणी गुलामगिरीत टाकू नये म्हणून सावध राहा;


अशा गोष्टींमुळे देवाच्या आज्ञा न पाळणाऱ्यांवर देवाचा कोप होतो.


कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर अंतिम बंड पुकारले जाऊन तो अनाचारी प्रकट होईल.


विविध आणि विचित्र प्रकारच्या शिकवणुकींनी बहकून जाऊ नका; अन्नविषयक नियमांनी नव्हे कारण हे नियम जे पाळतात त्यांना त्यांचा काही लाभ होत नाही. कृपेच्या सामर्थ्याने अंतःकरण मजबूत करणे हितावह आहे.


ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना तेथे प्रवेश करता आला नाही.


तसेच दुसरा धर्मशास्त्रलेख म्हणतो, हाच दगड ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक झाला. ते वचन मानीत नसल्यामुळे ठेचकाळतात. हीच त्यांच्यासाठी देवाची इच्छा होती.


प्रियजनहो, “मला पवित्र आत्मा मिळाला आहे”, असे म्हणणाऱ्या सर्व माणसांवर विश्वास ठेऊ नका, तर त्यांना मिळालेला आत्मा देवाकडून मिळालेला आहे किंवा नाही ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात वावरत आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan