Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 5:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही तुमच्यामध्ये उच्चार न होवो, ती उचित नाहीत, तर त्यांपेक्षा तुम्ही देवाचे आभार मानत राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत; तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. परंतु त्याऐवजी उपकारस्तुती असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आणि अश्लीलता, मूर्खपणाचे बोलणे, असभ्य विनोद यांचे तुम्हामध्ये स्थान नसावे, ते उचित नाहीत, त्याऐवजी उपकारस्तुती व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 5:4
29 Iomraidhean Croise  

व्यभिचार, जारकर्मे, खून, चोऱ्या, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, निंदानालस्ती, अहंकार व मूर्खपणा,


जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्‍ली होती, त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले.


कारण ज्याअर्थी देवाचे खरे ज्ञान लक्षात ठेवावयास ते नकार देतात, त्याअर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट मनाच्या स्वाधीन केले.


तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करता त्याप्रमाणे जो आशीर्वाद पुष्कळ जणांच्या प्रार्थनेमुळे आम्हांला मिळाला आहे, त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ लोक देवाचे आभार मानतील.


देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊ या.


मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो, मी माझ्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की,


तुमच्या मुखातून दुर्भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच फक्त निघो, ज्यामुळे ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे.


कशाविषयीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार मानत आपली गरज देवाला कळवा.


परंतु आता राग, क्रोध, व द्वेषभावना यांचा नायनाट करा. निंदा व शिवीगाळ करणे ह्या गोष्टी तुमच्या मुखापासून दूर राहोत.


तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदीआनंद करत आहोत, त्याबद्दल तुमच्यासंबंधाने आम्ही त्याचे आभार मानावेत तितके थोडे आहेत.


सर्व परिस्थितीत कृतज्ञ राहा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.


ह्याकरिता ख्रिस्तामध्ये तुझा बंधू ह्या नात्याने तुला जे योग्य ते आदेश देऊन सांगण्याचे मला धाडस करता आले असते.


ज्या ओठांनी आपण त्याचा देव म्हणून स्वीकार करतो, त्या ओठांचे फळ म्हणून आपण स्तुतीचा यज्ञ देवाला नित्य अर्पण करू या.


भ्रमात असणाऱ्या लोकांतून कोणी बाहेर पडतो न पडतो, तोच हे लोक त्यांना व्यर्थपणाच्या गर्विष्ठ व मूर्ख गोष्टी सांगतात व वासनाधीन करून कामातुरपणाचा मोह घालतात.


आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली.


तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत, त्यांची हे अवहेलना करतात आणि ज्या गोष्टी रानटी पशूंप्रमाणे ह्यांना सहज प्रवृत्तीने समजतात त्यांच्यायोगे हे आपला नाश करून घेतात.


हे लोक समुद्राच्या विक्राळ लाटांसारखे आहेत. त्यांची लज्जास्पद कृत्ये लाटांच्या फेसाप्रमाणे वर आलेली दिसतात. ते भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan