Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 5:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात, त्यांचा उल्लेख करणेदेखील लज्जास्पद आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणेदेखील लज्जास्पद आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयीचे वर्णन करणेदेखील लज्जास्पद आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 अवज्ञा करणारे जे गुप्तपणे करतात, त्यांचा उल्लेख करणे देखील लज्जास्पद होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 5:12
12 Iomraidhean Croise  

मी घोषित करीत असलेल्या शुभवर्तमानानुसार असे होणार आहे. माणसांच्या गुप्त विचारांचा न्याय ज्या दिवशी देव येशू ख्रिस्ताद्वारे करील, त्या दिवशी हे उघड होईल.


अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचे खरे स्वरूप उघड करा.


प्रकाशात उघड केलेल्या सर्व गोष्टी दृश्यमान होतील. जे दृश्यमय होते, ते प्रकाशमय असते.


पवित्र जनांमध्ये उचित ठरते त्याप्रमाणे लैंगिक अनैतिकता, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचा उल्लेखसुद्धा तुमच्यामधे केला जाऊ नये.


कारण यहुदीतर लोकांना आवडणारी कृत्ये करण्यात, म्हणजे स्वैराचार, कामासक्ती, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व बेकायदेशीर मूर्तिपूजा ह्यांत जो काळ गेला तितका पुरे.


मग मृत लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी गुंडाळ्या उघडल्या गेल्या, तेव्हा आणखी एक गुंडाळी उघडली गेली. ती जिवंत लोकांची होती. त्या गुंडाळ्यांमध्ये जे लिहिले होते त्यानुसार मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan