Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 5:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचे खरे स्वरूप उघड करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी, ती उघडकीस आणा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 5:11
48 Iomraidhean Croise  

तुझा भाऊ तुझा अपराधी असेल तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध काय ते त्याला सांग. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास, असे होईल.


मात्र त्याने राज्यकर्ता हेरोद ह्याला त्याच्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे


त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या सत्तेखालून देवाकडे वळावे म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांच्या पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे ह्यासाठी मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.’


रात्र सरत चालली आहे, दिवस जवळ येत आहे, म्हणून आपण अंधकाराची कृत्ये टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.


आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला शिक्षण मिळाले आहे, त्याविरुद्ध जे फूट पाडतात व अडथळे आणतात त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा;


तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त झाले? त्यांचा शेवट तर मरण आहे!


जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावाकडून नाशाचे पीक मिळेल आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्याकडून शाश्वत जीवन हे पीक मिळेल.


म्हणून तुमच्या पूर्वीच्या आचारणाचा कर्ता जो जुना मनुष्य तो भ्रष्ट व देहलालसेने भ्रमिष्ट झाला आहे. त्याचा तुम्ही त्याग करा.


त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात, त्यांचा उल्लेख करणेदेखील लज्जास्पद आहे.


म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका.


आणि ज्याने तुम्हांला प्रकाशातील पवित्र लोकांसाठी राखून ठेवलेल्या वतनाचे भागीदार होण्यासाठी पात्र केले, त्या पित्याचे तुम्ही आभार मानावेत.


झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात


ह्या पत्रातील आमचा बोध जर कोणी मानत नसेल, तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्याला लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका,


बंधुजनहो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हांला आज्ञा करतो की, आळशीपणाने वागणाऱ्या व आमच्यापासून प्राप्त झालेल्या परंपरेप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर राहावे.


इतरांना भय वाटावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर.


प्रभूच्या सेवेसाठी समर्पित करण्याकरिता प्रार्थना करण्यास उतावीळपणे कोणावर हात ठेवू नकोस. दुसऱ्यांच्या पापात तू सहभागी होऊ नकोस तर स्वतःला शुद्ध राख.


मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या व भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. अशा लोकांपासून तू दूर रहा.


आपल्या धर्माचे बाह्यरूप पकडून त्याचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. अशा लोकांपासून दूर राहा.


शुभसंदेशाची घोषणा कर, तो घोषित करण्याचा आग्रह सुवेळी व अवेळी धर, आत्यंतिक सहनशीलतेने शिक्षण देत खातरी पटवून दे, निषेध कर व प्रोत्साहन दे.


ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. त्यांच्यापैकी कोणीही तुला तुच्छ मानू नये.


मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली, ती म्हणाली: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुमच्यावर तिच्या विपत्तींमधील कोणतीही विपत्ती ओढवू नये म्हणून तिच्यामधून बाहेर पडा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan