Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 5:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 प्रभू कशामूळे संतुष्ट होतो, हे समजून घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 प्रभूला काय संतोषकारक2 आहे हे पारखून घेत जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 प्रभू कशाने प्रसन्न होतात याचा शोध घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 5:10
16 Iomraidhean Croise  

आणि अशा प्रकारे जो ख्रिस्ताची सेवा करतो, तो देवाला ग्रहणीय व मनुष्यांना पसंत आहे.


जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे


माझ्याजवळ सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदीतच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काही सुगंधित समर्पण असून देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे.


अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला प्रसन्न करण्याकरता त्याला शोभेल असे वागावे; म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाविषयीच्या पूर्ण ज्ञानात तुमची वृद्धी व्हावी.


सर्व गोष्टींची पारख करा. चांगले ते घट्ट धरून ठेवा.


हे योग्य असून देव आपला तारणारा त्याला हे आवडते.


कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली, तर त्यांनी प्रथम आपल्या घरातल्या कुटुंबीयांबरोबर धार्मिकतेने वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे; कारण हे देवाला आवडते.


म्हणून अविचल राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण कृतज्ञ राहू या, म्हणजे देव प्रसन्न होइल अशी त्याची आराधना आदरयुक्त भयाने करता येईल.


चूक केल्याबद्दल मिळालेली शिक्षा तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे, हे देवाच्या दृष्टीने आशीर्वादपात्र आहे.


तुम्हीही स्वतः सजीव दगडासारखे आध्यात्मिक मंदिर म्हणून रचले जात आहात, ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan