Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 4:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 एकच प्रभू, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा;

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 4:5
28 Iomraidhean Croise  

म्हणून तुम्ही जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना माझे शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.


येशू सर्वांचा प्रभू आहे व त्याच्याद्वारे देवाने शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करताना आपला जो संदेश इस्राएलच्या संततीस पाठवला तो तुम्हांला ठाऊक आहे.


म्हणून इस्त्राएलच्या सर्व घराण्यांनी हे ठामपणे समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही क्रुसावर चढवून मारलेत, त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे संबोधले आहे!”


देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व सुंता न झालेल्यांना तशाच विश्वासाद्वारे नीतिमान ठरवील, तर तो यहुदीतरांचाही देव आहे.


ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी क्रुसावर चढवले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय?


देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून:


त्याचप्रमाणे आपण यहुदी असू किंवा ग्रीक असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने अभिषिक्त झालो आहोत.


सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु त्यांच्याद्वारे एकाच प्रभूची सेवा केली जाते


तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याने सर्व काही निर्माण केले व आपण त्याच्यासाठी जगतो आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले व आपण त्याच्या कृपेने जगतो.


कारण तुम्ही आनंदाने असा माणूस खपवून घेता जो, आम्ही ज्याची घोषणा केली नाही, अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्ही स्वीकारलेल्या आत्म्यापेक्षा निराळा आत्मा तुम्ही स्वीकारता अथवा तुम्ही स्वीकारलेल्या शुभवर्तमानापेक्षा निराळे शुभवर्तमान स्वीकारता व सहजपणे तुम्ही त्याच्या आहारी जाता.


कारण जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये असतो तेव्हा सुंता करून घेणे वा न करणे यामुळे काही फरक पडत नाही; प्रीतीद्वारे कार्य करणारा विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे.


अशा प्रकारे देवाच्या पुत्रावरील विश्वासाने व त्यासंबंधी परिपूर्ण ज्ञानाने आपण प्रौढ होऊन एकीने जीवन जगू म्हणजे आपण सर्व ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत पोहचू.


आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, असे कबूल करावे.


इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढे मी सर्व काही निरर्थक समजतो, त्यामुळे मी ज्या गोष्टींना मुकलो त्यांना हानी लेखतो. ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ व्हावा,


देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल ह्याच्याकडून: देवाच्या निवडलेल्या लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी व त्यांना आपल्या धार्मिक सत्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला निवडण्यात व पाठविण्यात आले.


हे पत्र मी तीतला लिहिले आहे. ज्या श्रद्धेत आम्ही सहभागी झालो आहोत त्या श्रद्धेत तो माझा खराखुरा पुत्र आहे. देवपिता व आपला तारणारा येशू ख्रिस्त तुम्हांला कृपा व शांती देवो.


पूर्वी जे तुमचे आधिकारी होते, ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.


त्यांचे जर पतन झाले, तर त्यांना पश्चात्ताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने क्रुसावर खिळतात व त्याचा उघड-उघड अपमान करतात.


कोणी म्हणेल, एका माणसाकडे विश्वास आहे आणि दुसरा मनुष्य कृती करतो. माझे उत्तर असे आहे, कोणताही मनुष्य कृतीविना विश्वास कसा ठेवू शकतो, हे मला दाखवा. मी माझा विश्वास माझ्या कृतीद्वारे तुम्हांला दाखवीन.


त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे बाप्तिस्मा तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मल धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने परमेश्वराला दिलेले वचन असा आहे.


येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून: आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना,


प्रियजनहो, तुम्ही मात्र आपल्या परमपवित्र श्रद्धेवर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा,


प्रियजनहो, आपल्या सामाईक तारणाविषयी तुम्हांला लिहिण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत असताना तुम्हांला श्रद्धेच्या लढाईत टिकून राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता लिहिण्याची मला आवश्यकता वाटली. ही श्रद्धा देवाने निर्णायक स्वरूपात पवित्र जनांच्या हवाली केली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan