Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 4:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 तुम्ही तर त्याच्याविषयी निश्‍चितपणे ऐकले व त्याच्यामध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला शिक्षण मिळाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 जर तुम्ही त्याच्याबद्दल ऐकले असेल आणि त्याकडून येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हास त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल ऐकले आणि येशूंमध्ये जे सत्य आहे त्याबद्दल तुम्ही शिकला आहात;

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 4:21
20 Iomraidhean Croise  

तो बोलत असताना प्रकाशमान मेघाने त्यांच्यावर छाया धरली आणि मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याच्याविषयी मी प्रसन्न आहे. ह्याचे तुम्ही ऐका.”


येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले, त्याचा अव्हेर करतो.”


नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. परंतु कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली.


माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात.


जग त्याला स्वीकारू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तुमच्यामध्ये वसती करील.


येशूने त्याला म्हटले, “मी मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.


मात्र ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील?


देवाची वचने कितीही असोत, ख्रिस्तामध्ये ती होकारार्थीच असतात. म्हणून आम्ही देवाच्या गौरवासाठी त्याच्याद्वारे होकार देतो,


माझ्यातील ख्रिस्ताच्या सत्याला स्मरून मी सांगतो की, माझा हा अभिमान संपूर्ण अखया प्रांतात कुठेही नाकारला जाणार नाही.


तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीचे शुभवर्तमान ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने वचन दिलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्यामध्ये ठसा उमटविण्यात आला आहे.


त्याने येऊन जे तुम्ही दूर होता, त्या तुम्हांला आणि जे जवळ होते त्या यहुदी लोकांनाही शांतीचे शुभवर्तमान सांगितले.


जेव्हा खरा संदेश म्हणजेच शुभवर्तमान प्रथम तुमच्याकडे पोहोचले, तेव्हा ही आशा तुमच्यासाठी स्वर्गात सुरक्षित राखून ठेवण्यात आली आहे.


तुम्ही हे शुभवर्तमान ऐकले व खरेपणाने त्या दिवसापासून जसे तुमच्यामध्ये तसेच सर्व जगातही हे शुभवर्तमान फळ देत आहे व पसरत चालले आहे. तुम्ही देवाची कृपा सत्यस्वरूपात जाणून घेतली आहे.


त्याच्यामध्ये रुजलेले, रचले जात असलेले, तुम्हांला शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर कृतज्ञता व्यक्त करणारे व्हा.


आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे, त्या परमेश्वराला ओळखण्याची समज त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबरच्या ऐक्यात आपण जीवन जगत आहोत. हाच खरा देव आहे आणि हेच खरे शाश्वत जीवन आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan