Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 4:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठोरपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्यांचे विचार अंधकारमय झालेले आहेत आणि त्यांच्या अंतःकरणातील हट्टीपणामुळे त्यांच्यात अज्ञान असून देवाच्या जीवनापासून ते वेगळे झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 कारण त्यांचे विचार व बुद्धी अंधकारमय झाली असून, ते त्यांच्या हृदयाच्या कठीणपणामुळे अज्ञानी झाले आहेत व परमेश्वराच्या जीवनापासून दूर गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 4:18
34 Iomraidhean Croise  

ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. नाही तर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, कानांनी ऐकतील, त्यांच्या अंतःकरणांना समजेल, ते माझ्याकडे वळतील व मी त्यांना बरे करीन.


त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे खिन्न होऊन त्याने त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात पुढे कर.” त्याने हात पुढे केला आणि तो बरा झाला.


त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, माझ्याकडे वळू नये व मी त्यांना बरे करू नये, म्हणून देवाने त्यांचे डोळे आंधळे व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.


अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा, अशी आज्ञा तो माणसांना करतो.


बंधूंनो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनी जे केले, ते अज्ञानामुळे केले, हे मी जाणून आहे.


कारण ज्याअर्थी देवाचे खरे ज्ञान लक्षात ठेवावयास ते नकार देतात, त्याअर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट मनाच्या स्वाधीन केले.


बंधुजनहो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, यहुदीतरांचा भरणा पूर्ण होईपर्यंत इस्राएली लोक तात्पुरते दुराग्रहाने श्रद्धेपासून दुरावले आहेत.


तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्राएल नेटाने प्रयत्न करत होते, ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्या लोकांच्या गटाला मिळाले आणि बाकीचे लोक कठिण अंत:करणाचे झाले.


आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे, म्हणून आपण आंधळ्याचा वाटाड्या, अंधारात असलेल्यांचा प्रकाश,


जगाला स्वतःच्या शहाणपणाद्वारे देवाची ओळख पटली नाही. आम्ही केलेली घोषण़ा जगाला मूर्खपणाची वाटली. म्हणून देवाने त्याच्या शहाणपणानुसार ठरवले की, ह्या घोषणेवर जे श्रद्धा ठेवतात त्यांचे तारण व्हावे.


ते ह्या युगातल्या अधिपतींतील कोणालाही कळले नव्हते; कारण त्यांना ते कळले असते, तर त्यांनी गौरवशाली प्रभूला क्रुसावर चढवले नसते.


परंतु त्यांची मने खरोखर कठोर झाली आणि आजतागायत जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन तसेच न काढलेले आढळते. जेव्हा मनुष्य ख्रिस्ताशी जोडला जातो तेव्हा हे आच्छादन दूर केले जाते.


त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची तंतोतंत प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या वैभवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये.


पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता आणि त्यामुळे जे वस्तुतः देव नाहीत, त्यांचे तुम्ही गुलाम होता.


तुम्ही आपले अपराध व आपली पापे ह्यांमुळे पूर्वी मृत झाला होता.


तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएल राष्ट्राबाहेरचे, वचनांच्या करारांना परके, आशाहीन व देवाविना असे जीवन जगत होता.


आणि जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता,


देवाला न ओळखणाऱ्या यहुदीतरांप्रमाणे कामवासनेने तुम्ही वागू नये.


अज्ञानी व बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टिलेला आहे


परंतु दुसऱ्यांत प्रमुख याजक वर्षांतून एकदा एकटाच जात असे तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या नकळत केलेल्या पापांबद्दल जे रक्त अर्पण करीत असत, ते घेतल्याशिवाय जात नसे.


अहो, अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरतो.


तुम्ही आज्ञाधारक मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागू नका.


पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे, अंधारात चालतो आणि तो कोठे चालला आहे, हे त्याचे त्यालाच कळत नाही, कारण अंधाराने त्याच्या डोळ्यांवर अंधत्व आणलेले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan