Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 3:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 म्हणजे प्रकटीकरणाद्वारे मला रहस्य कळविले गेले, त्याप्रमाणे मी जे वर थोडक्यात लिहिले आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जसे मला प्रगटीकरणाद्वारे सत्याचे गुपित कळवले गेले मी त्यावर कमी लिहीले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 अर्थात् हे रहस्य मला प्रकटीकरणाद्वारे समजले, याबद्दल मी यापूर्वी थोडक्यात लिहिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 3:3
23 Iomraidhean Croise  

मी यरुशलेमला परत आल्यावर, मंदिरात प्रार्थना करत असता मला दृष्टान्त घडला.


तेव्हा प्रभूने मला सांगितले, ‘जा, मी तुला यहुदीतरांकडे दूर पाठवतो.’”


तेथे मोठी गडबड उडाली. जे शास्त्री परुश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यांतून काही जण उठून तणतण करीत म्हणाले, “ह्या माणसाच्या ठायी आम्हांला काही वाईट दिसत नाही, कदाचित आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर खरोखर बोलला असेल!”


बंधुजनहो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे, अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, यहुदीतरांचा भरणा पूर्ण होईपर्यंत इस्राएली लोक तात्पुरते दुराग्रहाने श्रद्धेपासून दुरावले आहेत.


आपण देवाचा गौरव करू या. तुम्हांला तुमच्या विश्वासात स्थिर करण्यास तो समर्थ आहे. येशू ख्रिस्ताविषयीचे जे शुभवर्तमान मी घोषित करतो त्यानुसार व जे रहस्य गत युगात गुप्त ठेवलेले होते, परंतु आता जे प्रकट करण्यात आले आहे त्यानुसार तो हे करीत आहे.


प्रौढी मिरवणे मला भाग पडते. तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मला झालेले प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरण ह्यांच्याकडे मी आता वळतो.


कारण ते मला मनुष्याकडून प्राप्त झाले नाही आणि ते मला कोणी शिकवलेही नाही तर येशू ख्रिस्ताने स्वतः ते मला प्रकट करून दाखवले आहे.


आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला त्याच्या स्वरूपाविषयीचे ज्ञान व प्रकटीकरण देणारा पवित्र आत्मा द्यावा.


ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाले ते तुम्हांला समजेल.


ते रहस्य हे की, यहुदीतर लोक ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, एकशरीर व अभिवचनाचे सहभागी आहेत.


व ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवामध्ये युगादिकालापासून गुप्त ठेवलेल्या रहस्याची व्यवस्था कशी होणार आहे, हे सर्वांना प्रकट करून दाखवावे.


जेव्हा मी संदेश देण्यासाठी उभा राहीन, तेव्हा देवाने मला त्याचा संदेश द्यावा म्हणजे धैर्याने मला शुभवर्तमानाचे रहस्य लोकांना कळविता यावे, म्हणून माझ्यासाठीही प्रार्थना करा.


ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रीतीने एकमेकांना ते जोडले जावेत, ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाच्या, म्हणजे पित्याच्या व ख्रिस्ताच्या रहस्याचे, पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे.


ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी तुरुंगात आहे, त्याविषयीचा संदेश सांगावयास देवाने आम्हांला चांगली संधी द्यावी


बंधूंनो, मी तुम्हांला आवाहन करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे.


माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवीत आहे. ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.


आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan