Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 2:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 देवाच्या कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 2:8
40 Iomraidhean Croise  

येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, तू धन्य आहेस; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे.


जे पाचच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना संपूर्ण दिवसाची मजुरी मिळाली.


जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही त्याला दोषी ठरवण्यात येईल.


त्यानंतर त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”


जो पुत्रावर श्रद्धा ठेवतो, त्याला शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे; जो पुत्रावर श्रद्धा ठेवत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहील.”


येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे वरदान म्हणजे काय, आणि ‘मला प्यायला दे’, असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते, तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जीवनदायक पाणी दिले असते.”


मी तुम्हांला खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याला शाश्वत जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याचा न्याय केला जाणार नाही, त्याने मरणातून जीवनात प्रवेश केला आहे.


येशू त्यांना म्हणाला, “मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो, त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला कधीही तहान लागणार नाही.


ज्याला पिता माझ्याकडे सोपवतो, असा प्रत्येक जण माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो, त्याचा मी मुळीच अव्हेर करणार नाही.


जे कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना शाश्वत जीवन प्राप्त व्हावे आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवावे ही माझ्या पित्याची इच्छा आहे.”


ज्याने मला पाठवले, त्या पित्याने ओढून घेतल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही आणि अशा माणसाला शेवटच्या दिवशी मी उठवीन.


पुढे तो म्हणाला, “म्हणून मी तुम्हांला सांगितले की, पित्याने त्याला समर्थ केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.”


ज्याविषयी मोशेच्या नियमशास्रानुसार तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो.


तेथे पोहचल्यावर त्यांनी ख्रिस्तमंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि यहुदीतरांकरिता विश्वासाचे दार कसे उघडले, हे सांगितले.


तर मग जसे त्यांचे तसे आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने झाले आहे, असा आपला विश्वास आहे.”


तेथे लुदिया नावाची एक स्त्री होती. ती थुवतीरा नगरची होती व जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.


त्यांनी उत्तर दिले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”


मात्र ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील?


ह्याप्रमाणे संदेश ऐकल्याने विश्वास मिळतो व संदेश ख्रिस्ताच्या शद्बाद्वारे प्राप्त होतो.


ह्या कारणामुळे ते अभिवचन कृपेवर आधारित असावे म्हणून ते श्रद्धेवर अवलंबून असते. अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहाम ह्याचा जो विश्वास होता, त्याच्या श्रद्धेत जे सहभागी होतात, त्यांनाही उपलब्ध व्हावे.


अधार्मिकाला नीतिमान ठरवणाऱ्या देवावर जो विश्वास ठेवतो पण सकृत्ये करीत नाही, त्याला त्याच्या विश्वासामुळे नीतिमान गणण्यात येते.


ह्यावरून इच्छा बाळगणाऱ्या किंवा कृती करणाऱ्यावर काही अवलंबून नाही; तर दया करणाऱ्या देवावर सर्वकाही अवलंबून आहे.


ह्यात उद्देश हा की, अब्राहामला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये यहुदीतर लोकांना मिळावा, ज्यामुळे आपणाला विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.


परंतु धर्मशास्त्रलेख असे म्हणतो की, नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ज्यामुळे विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने जे अभिवचन मिळते ते देण्यात यावे.


आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपल्याविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व या गोष्टी, तुम्ही त्याच्या सामर्थ्यशाली पराक्रमाच्या कृतीवरून जाणून घ्याव्यात.


आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आपली निर्मिती करण्यात आली आहे. आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये करीत आपण आपले जीवन जगावे म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली आहेत.


ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले; देवाच्या कृपेने आपले तारण झालेले आहे


कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे.


तुमचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्या देवाच्या सामर्थ्यशाली कृतीवरील विश्वासाद्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेलात.


त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या गौरवशाली सामर्थ्यापासून दूर करण्यात येऊन शाश्वत विनाश ही शिक्षा मिळेल.


कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले


तुम्हांला तारणासाठी श्रद्धेद्वारे देवाच्या सामर्थ्याने सुरक्षित राखण्यात आले आहे. हे तारण शेवटच्या काळी प्रकट होणार आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan