Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 2:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 खरे म्हणजे आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो. आम्हीदेखील आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे वागत क्रोधासाठी नेमलेले होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आम्ही सर्व यापूर्वी या अविश्वासणाऱ्यांमध्ये आपल्या शारीरिक वासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे राग येणारे लोक होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 एकेकाळी आपणही त्यामध्ये जगत होतो. आपल्यामधील दैहिक वासना आणि विचार यांचे अनुसरण करणार्‍यांप्रमाणेच नैसर्गिकरित्या परमेश्वराच्या क्रोधास पात्र होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 2:3
54 Iomraidhean Croise  

परंतु प्रपंचाची चिंता, पैशाचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.


त्यांचा जन्म रक्त, किंवा देहवासना, किंवा मनुष्याची इच्छा, ह्यांच्यामुळे झाला नाही, तर देवाकडून झाला.


तुम्ही तुमचा बाप सैतान ह्याच्यापासून जन्मला आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यापुढे टिकला नाही. त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, तेव्हा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलतो; कारण तो लबाड असून सर्व असत्याचा बाप आहे.


त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालू दिले.


ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनांत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. असे की, त्यांच्या देहाची त्यांच्या त्यांच्यातच विटंबना व्हावी.


पूर्वी तुम्ही ग्रीक लोक देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला यहुदी लोकांच्या आज्ञाभंगांमुळे दया प्राप्त झाली आहे.


परंतु तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची शस्रसामग्री धारण करा आणि देहवासना तृप्त करण्याची तरतूद करू नका.


ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, असे यहुदीतर जेव्हा नियमशास्त्रात जे आहे, ते स्वभावतः करत असतात तेव्हा, त्यांच्याकडे नियमशास्त्र नसले तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत.


आपण शत्रू असता देवाबरोवर त्याच्या पुत्राच्या मृत्युद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता, त्याच्या जीवनाने आपण किती अधिक प्रमाणात तारले जाणार आहोत!.


तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण किती अधिक प्रमाणात त्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत!.


म्हणून तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन होऊ नये ह्यासाठी पापाने तुमच्या मर्त्य शरीरावर राज्य करू नये.


मला ठाऊक आहे की, माझ्यामध्ये म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही.


आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले


तुला इतरांपेक्षा श्रेष्ठ कोणी केले? जे तुला दिलेले नाही, असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अहंकार तू का बाळगतोस?


प्रियजनहो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि देवाचे भय बाळगून आपण पूर्णपणे पवित्र होऊ या.


परंतु धर्मशास्त्रलेख असे म्हणतो की, नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ज्यामुळे विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने जे अभिवचन मिळते ते देण्यात यावे.


त्या वेळी तुम्ही पापांमध्ये चालत होता, अर्थात, ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणारा दुरात्मा ह्याच्या धोरणाप्रणाणे चालत होता.


म्हणून तुमच्या पूर्वीच्या आचारणाचा कर्ता जो जुना मनुष्य तो भ्रष्ट व देहलालसेने भ्रमिष्ट झाला आहे. त्याचा तुम्ही त्याग करा.


आणि जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता,


बंधुजनहो, निधन पावलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशा नाही अशा इतर लोकांसारखा तुम्ही शोक करू नये.


म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे राहून सावध असावे.


परंतु जे धनवान होऊ पाहतात, ते मोहपाशात सापडून मूर्खपणाच्या बाधक वासनांत अडकून स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतात;


कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो.


तुम्ही आज्ञाधारक मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागू नका.


शीलभ्रष्ट स्त्रियांशिवाय त्यांना दुसरे काही पाहायला आवडत नाही. पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात. त्यांची हृदये लोभात निर्ढावलेली असतात; ते शापग्रस्त लोक आहेत!


भ्रमात असणाऱ्या लोकांतून कोणी बाहेर पडतो न पडतो, तोच हे लोक त्यांना व्यर्थपणाच्या गर्विष्ठ व मूर्ख गोष्टी सांगतात व वासनाधीन करून कामातुरपणाचा मोह घालतात.


जगात जे सर्व आहे, ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व श्रीमंतीचा अहंकार ह्या गोष्टी पित्याकडून नाहीत, तर जगाच्या आहेत.


तरी एक प्रकारे मी तुम्हांला नवी आज्ञा लिहितो. ती ख्रिस्ताच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशी आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता उजळत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan