Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 1:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 त्याचे सर्व शहाणपण व अंतर्ज्ञान ह्यांना अनुसरून त्याने आपल्यावर कृपेचा वर्षाव केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 सर्व ज्ञान व बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 देवाची ही कृपा आम्हास सर्व ज्ञानाने आणि विवेकाने भरपूर पुरवण्यात आली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आपल्यावर कृपेची वृष्टी केली आहे. सर्व ज्ञान व बुद्धीने,

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 1:8
17 Iomraidhean Croise  

मनुष्याचा पुत्र खातपीत आला तर त्याच्याविषयी लोक म्हणतात, ‘पाहा, खादाड व दारूबाज मनुष्य. जकातदारांचा व पापी लोकांचा मित्र!’ परंतु परमेश्वराची सुज्ञता त्याच्या कृत्यांवरून सिद्ध होते.”


अहाहा, देवाच्या सुज्ञतेची व ज्ञानाची समृद्धी किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती अनाकलनीय आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!


परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता फारच अधिक प्रमाणात विपुल झाली


तर देवाचे गूढ व गुप्त ठेवलेले ज्ञान आम्ही सांगतो, जे देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या वैभवाकरिता नेमले होते.


आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो सर्व काही चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे ख्रिस्तावरील आपल्या निष्ठेमुळे त्याने आपल्याला त्याचे वारसदार म्हणून निवडले आहे.


त्याच्या कृपेच्या समृद्धीनुसार त्याच्या रक्‍ताद्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे अपराधांची आपल्याला क्षमा मिळाली आहे.


स्वत:च्या आवडीनुसार ख्रिस्तामध्ये ठरविलेल्या योजनेअंतर्गत त्याने त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले.


ह्यासाठी की, जो युगादिकालचा संकल्प त्याने आपल्या ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे बहुरूपी ज्ञान अंतराळातील अधिपती व अधिकारी ह्यांना ख्रिस्तमंडळीद्वारे आता कळावे.


परमेश्वराच्या सुज्ञतेचा व ज्ञानाचा सर्व गुप्त खजिना स्वतः ख्रिस्तामध्ये दडलेला आहे.


त्या आपल्या उद्धारक अशा एकमेव देवाला, येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे वैभव, ऐश्वर्य, सामर्थ्य व अधिकार ही युगारंभापूर्वी, आत्ता व युगानुयुगे असोत! आमेन.


ते उच्च स्वरात गात होते, “वधलेले कोकरू सामर्थ्य, धन, सुज्ञता, पराक्रम, सन्मान, गौरव व धन्यवाद हे स्वीकारण्यास पात्र आहे!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan