Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 1:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 त्याच्या कृपेच्या समृद्धीनुसार त्याच्या रक्‍ताद्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे अपराधांची आपल्याला क्षमा मिळाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्या प्रिय पुत्राच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे, देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या विपुल कृपेद्वारे व त्यांच्या रक्ताद्वारे खंडणी म्हणून आपल्याला पापांची क्षमा देऊन

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 1:7
67 Iomraidhean Croise  

जसे मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे, तर सेवा करायला व पुष्कळांसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”


हे माझे कराराचे रक्‍त आहे. हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरता ओतले आहे.


आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आम्हांला आमच्या अपराधांची क्षमा कर


येशू त्यांना म्हणाला, “हे माझे कराराचे रक्‍त आहे, हे पुष्कळांकरता ओतले आहे.


त्यांना पापांची क्षमा मिळून त्यांचा उद्धार होईल, असे तू परमेश्वराच्या लोकांना सांगशील.


आणि यरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.


ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा कराल त्यांची क्षमा केली जाईल आणि ज्यांच्या पापांची तुम्ही क्षमा करणार नाही त्यांची क्षमा केली जाणार नाही.”


त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल, अशी साक्ष सर्व संदेष्ट्ये त्याच्याविषयी देतात.”


पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा मिळेल आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.


म्हणून तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला मेंढपाळ नेमले आहे त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी ख्रिस्तमंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे.


तुमची पापे माफ व्हावीत म्हणून पश्चात्ताप करा व देवाकडे वळा म्हणजे प्रभूच्या सहवासात तुम्हांलाही नवचैतन्य लाभेल


किंवा देवाचा चांगुलपणा तुला पश्चात्ताप करायला लावणारा आहे हे न समजून तू त्याचा चांगुलपणा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?


देवाच्या कृपेने एक दान म्हणून सर्व लोक ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीद्वारे देवाबरोबर नीतिमान ठरले आहेत.


त्याच्या आत्मबलिदानाद्वारे त्याने सर्वांसाठी क्षमा मिळवावी व ख्रिस्तावरील श्रद्धेने सर्वांनी ही क्षमा आपलीशी करावी म्हणून देवाने ख्रिस्त अर्पण केला. देवाने हे अशासाठी केले की, तो स्वतः नीतिमान आहे हे त्याला दाखवून द्यावयाचे होते. पूर्वी त्याने पापांकडे सहनशीलतेने व दयादृष्टीने पाहिले परंतु आता पापांच्या क्षमेसाठी तो त्याचे नीतिमत्व दाखवू इच्छितो. अशा प्रकारे तो दाखवून देतो की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात व हेच त्याचे नीतिमत्त्व आहे.


आणि ज्या आपल्याला केवळ यहुदी लोकांतून नव्हे तर यहुदीतरांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी, असे त्याला वाटत असले, तर काय?


तो आपल्यासाठी देवाचे ज्ञान, नीतिमत्त्व, पवित्रीकरण आणि तारण झाला आहे. देवामुळे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे.


हा पवित्र आत्मा आपल्या वारशाची हमी आहे व यामुळे आपल्याला खातरी बाळगता येते की, परमेश्वर त्याच्या स्वकीयांना खंडणी भरून मिळविलेली मुक्ती प्रदान करील. आपण त्याच्या वैभवाची स्तुती करू या!


म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा, पवित्र लोकांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी


त्याच्या ह्या वैभवशाली कृपेबद्दल आपण त्याची स्तुती करू या. त्याच्या प्रिय पुत्रामध्ये त्याने आपल्याला हे अनमोल वरदान दिले आहे.


त्याचे सर्व शहाणपण व अंतर्ज्ञान ह्यांना अनुसरून त्याने आपल्यावर कृपेचा वर्षाव केला आहे.


परंतु देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या विपुल प्रीतीमुळे,


ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या तुमच्याआमच्याविषयीच्या सदिच्छेद्वारे पुढे येणाऱ्या सर्व युगांत त्याने आपल्या कृपेची समृद्धी दाखवावी म्हणून त्याने हे केले.


त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीनुसार तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे.


सर्व पवित्र लोकांतील कनिष्ठ अशा माझ्यावर ही कृपा अशाकरिता झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीचे शुभवर्तमान यहुदीतर लोकांकरिता घेऊन जावे


माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील.


त्या पुत्रामध्ये, खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांबद्दल आपल्याला क्षमा मिळाली आहे.


हे गौरवशाली रहस्य त्याच्या लोकांना कळविण्यात यावे, ही देवाची योजना आहे. गौरवशाली आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तो हे रहस्य आहे.


तुम्ही एके काळी आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेला होता. त्याने आपल्या सर्व अपराधांबद्दल क्षमा करून आपल्याला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले.


ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रीतीने एकमेकांना ते जोडले जावेत, ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाच्या, म्हणजे पित्याच्या व ख्रिस्ताच्या रहस्याचे, पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे.


त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला अर्पण केले. परमेश्वराला सर्वांचे तारण हवे आहे, याचे हे योग्य समयी दाखविलेले प्रमाण आहे


आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक स्वतःकरिता शुद्ध करून ठेवण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केले.


देवपित्याने हा पवित्र आत्मा आपल्या तारणाऱ्या येशू खिस्ताद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे.


नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून क्षमा मिळत नाही.


त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही क्रुसावर वाहिली, ह्यासाठी की, आपण पाप करणे सोडून देऊन सदाचरणासाठी जगावे. त्याच्या जखमांनी तुम्ही निरोगी झाला आहात.


आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, एकदा निर्णायक स्वरूपाचे मरण सोसले. तो देहरूपात ठार मारला गेला आणि आत्म्याच्या रूपाने जिवंत केला गेला.


मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची क्षमा झाली आहे.


आणि त्याच्याच साहाय्याने आपल्याला पापांची क्षमा मिळते; केवळ आपल्याच पापांची नव्हे तर सर्व जगाच्याही पापांची क्षमा मिळते.


प्रीती म्हणावी तर हीच:आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हांवर प्रीती केली आणि तुम्हाआम्हांला पापांची क्षमा मिळावी म्हणून त्याच्या पुत्राला पाठविले.


स्त्री संभोग टाळून शुद्ध राहिलेले ते हेच आहेत, ते ब्रह्मचर्य पाळणारे आहेत. जेथे कोठे कोकरू जाते, तेथे त्याच्यामागे जाणारे ते आहेत. ते देवासाठी व कोकरासाठी प्रथम फळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.


ते नवे गीत गात होते: “तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास पात्र आहेस, कारण तुझा वध करण्यात आला होता व तुझ्या बलिदानात्मक मृत्यूने तू सर्व वंश, भाषा बोलणारे, लोक आणि राष्ट्रे देवासाठी विकत घेतली आहेत


Lean sinn:

Sanasan


Sanasan