Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इफिसकरांस 1:10 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 ही योजना म्हणजे स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे, ते सर्व ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली एकत्रित करावे. योग्य वेळी परमेश्वर हे पूर्ण करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा काळाची पूर्णता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 ही योजना काळाच्या पूर्णतेची होती, यासाठी की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र व्हाव्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इफिसकरांस 1:10
29 Iomraidhean Croise  

त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि मेंढपाळ जसे शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळी करील.


“काळाची परिपूर्ती झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्‍चात्ताप करा व शुभवर्तमानावर विश्वास ठेवा.”


ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या व आपल्याला इशारा देण्यासाठी त्या लिहून ठेवण्यात आल्या आहेत कारण आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहचलो आहोत.


प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे. स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे असी माझी इच्छा आहे.


परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.


परमेश्वराने सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले आणि त्याने सर्वांचे मस्तक व्हावे म्हणून त्यास ख्रिस्तमंडळीसमोर सादर केले.


त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले, हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र, ह्यासाठी की, स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी,


मला तुमच्यासाठी देवाची कृपा प्राप्त झाली. तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही निश्चितच ऐकले आहे.


कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी जे काही आहे; ते सर्व त्याच्याद्वारे निर्माण झाले. सर्व विश्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे.


म्हणूनच पुत्राद्वारे साऱ्या गोष्टींचा त्याने स्वतःशी समेट घडवून आणला. त्याच्या क्रुसावरील रक्ताद्वारे शांती घडवून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे त्या सर्वांचा - मग ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो


परिणामी, ग्रीक व यहुदी, सुंता झालेला व न झालेला, रानटी व स्कुथीपंथीय, गुलाम व स्वतंत्र असा भेद उरला नाही. तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वांत आहे.


परंतु ह्या शेवटच्या काळात तो त्याच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याच्याद्वारे विश्व निर्माण केले आणि त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले.


कारण देवाने आपणासाठी अधिक चांगली योजना आखली होती आणि ती म्हणजे त्यांना आपणासर्वांबरोबर पूर्णत्व प्राप्त व्हावे.


खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांच्यासह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत. ते नवीन व्यवस्था प्रस्थापित होईपर्यंत लावून दिले आहेत.


ज्याला जगाच्या स्थापनेपूर्वीपासून निवडण्यात आले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला.


ते नवे गीत गात होते: “तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास पात्र आहेस, कारण तुझा वध करण्यात आला होता व तुझ्या बलिदानात्मक मृत्यूने तू सर्व वंश, भाषा बोलणारे, लोक आणि राष्ट्रे देवासाठी विकत घेतली आहेत


Lean sinn:

Sanasan


Sanasan