Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




कलस्सै 2:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 परमेश्वराच्या सुज्ञतेचा व ज्ञानाचा सर्व गुप्त खजिना स्वतः ख्रिस्तामध्ये दडलेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3-4 त्याच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे धन लपलेले आहेत. कोणी तुम्हास लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि त्यांच्यामधेच सर्व बुद्धीची व ज्ञानाची भांडारे गुप्त ठेवलेली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




कलस्सै 2:3
21 Iomraidhean Croise  

तर मग तुम्ही त्यांना भिऊ नका. उघडकीस येणार नाही, असे काही झाकलेले राहणार नाही आणि प्रत्येक गुपित उघड केले जाईल.


ह्यावरून देवाच्या शहाणपणाने स्पष्ट केले आहे, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यांतील कित्येकांना ते ठार मारतील व कित्येकांना छळतील.’


अहाहा, देवाच्या सुज्ञतेची व ज्ञानाची समृद्धी किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती अनाकलनीय आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!


मात्र पाचारण झालेल्या यहुदी व ग्रीक अशा दोघांनाही तो संदेश म्हणजे स्वतः ख्रिस्त आहे, तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे.


तो आपल्यासाठी देवाचे ज्ञान, नीतिमत्त्व, पवित्रीकरण आणि तारण झाला आहे. देवामुळे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात.


त्याचे सर्व शहाणपण व अंतर्ज्ञान ह्यांना अनुसरून त्याने आपल्यावर कृपेचा वर्षाव केला आहे.


कारण पित्याला हे आवडले की, त्याच्यामध्ये सर्व परिपूर्णता राहावी.


ख्रिस्त येशूमध्ये प्रत्येक माणसाने परिपूर्ण झालेले असे आम्हांला सादर करता यावे म्हणून आम्ही सर्वांना ख्रिस्ताची घोषणा करतो, प्रत्येक माणसाला सावध करतो व प्रत्येक माणसाला सर्व प्रकारच्या ज्ञानाने सुशिक्षित करतो.


म्हणूनच तुमच्याविषयी आम्ही ऐकले तेव्हापासून आम्ही सर्वदा तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत की, त्याच्या इच्छेसंबंधी पूर्ण ज्ञान व आध्यात्मिक सुज्ञता व समज तुम्हांला प्राप्त होवो.


ख्रिस्ताचा संदेश त्याच्या समृद्धीसह तुमच्या अंतःकरणामध्ये राहो. परस्परांस सर्व सुज्ञतेने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, भक्तिगीते व आध्यात्मिक गायने कृतज्ञतेने गा.


कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.


ह्याच कारणासाठी तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची,


पवित्र आत्मा ख्रिस्तमंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत त्याने ऐकून घ्यावे! जो विजय मिळवतो, त्याला गुप्त राखलेल्या मान्न्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन, त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही माहीत होणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan