Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रेषित 10:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 त्याने एकदा दुपारी तीनच्या सुमारास दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपल्याकडे देवाचा दूत येत असून, “कर्नेल्य”, अशी आपल्याला हाक मारत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याने दिवसाच्या सुमारे तिसर्‍या प्रहरी दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून “कर्नेल्या,” अशी आपणास हाक मारत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टांत झाला, त्याने तो स्पष्टपणे पाहिला, त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “कर्नेल्या!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याला एक दृष्टान्त झाला. त्याने स्पष्टपणे असे पाहिले की, परमेश्वराचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रेषित 10:3
23 Iomraidhean Croise  

आणि सुमारे तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”


धूप जाळले जात असताना प्रभूचा दूत वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला.


इतक्यात स्वर्गीय समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले,


आपण पाहिलेल्या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा, ह्याविषयी पेत्र विचारात पडला असता, पाहा, कर्नेल्यने पाठवलेली माणसे शिमोनचे घर शोधत त्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभी राहिली,


पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता पवित्र आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध घेत आहेत.


कर्नेल्य म्हणाला, “आज चार दिवस झाले, मी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या घरी प्रार्थना करत होतो. ही प्रार्थना करीत असताना तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष माझ्यासमोर उभा राहून मला म्हणाला,


दुसऱ्या दिवशी ते गावाजवळ आले, तेव्हा मध्यान्हीच्या वेळी पेत्र प्रार्थना करावयास छपरावर गेला,


त्याने आम्हांला सांगितले, “मी माझ्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, ‘यापो येथे कोणाला पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनला बोलावून आण.


कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी आराधना करतो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,


एके दिवशी पेत्र व योहान हे दुपारी तीनच्या प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात गेले.


परंतु त्या रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले,


इकडे दिमिष्क नगरात हनन्या नावाचा एक शिष्य होता, त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, “हनन्या!” त्याने म्हटले, “काय प्रभो?”


तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी आकाशवाणी ऐकली की, “शौल, शौल, तू माझा छळ का करतोस?”


तर मग देवदूत कोण आहेत? ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठविलेले, ते सर्व परमेश्वराचे सेवक नाहीत काय?


पुत्राला देवाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ केले आहे - अगदी त्यांच्या नावापेक्षा अधिक श्रेष्ठ नाव त्याला दिले आहे तसे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan