प्रेषित 1:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1-2 प्रिय थियफिल, येशूने कार्य करायला आरंभ केल्यापासून त्याला स्वर्गात घेतले गेले, तोपर्यंत त्याने जे जे केले व शिकविले त्या सर्वांविषयी मी माझ्या पहिल्या पुस्तकात लिहिले. स्वर्गात घेतला जाण्यापूर्वी ज्यांना त्याने प्रेषित म्हणून निवडले होते, त्यांना त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आदेश दिला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 थियफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे थियफिला, येशूने जे शिकवले आणि केले, व ज्या विषयी मी पहिल्या ग्रंथात नमुद केले, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 थियफिल महोदय, मी माझ्या पहिल्या ग्रंथात, येशूंनी जे कार्य करण्यास आणि शिक्षण देण्यास सुरुवात केली त्या दिवसापासून, Faic an caibideil |
येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्याला योसेफचा पुत्र असे समजत. योसेफचे पूर्वज अनुक्रमे पुढीलप्रमाणे:एली, मत्ताथ, लेवी, मल्खी, यन्नया, योसेफ, मत्तिथा, आमोस, नहूम, हेस्ली, नग्गय, महथा, मत्तिथा, शिमयी, योसेख, योदा, योहानान, रेश, जरुब्बाबेल, शल्तिएल, नेरी, मल्खी, अद्दी, कोसाम, एल्मदाम, एर, येशू, अलियेजर, योरीम, मत्ताथ, लेवी, शिमोन, यहुदा, योसेफ, योनाम, एल्याकीम, मलआ, मिन्ना, मत्ताथ, नाथान, दावीद, इशाय, ओबेद, बलाज, सल्मोन, नहशोन, अम्मीनादाब, आद्मीन, अर्णय, हेस्रोन, पेरेस, यहुदा, याकोब, इसहाक, अब्राहाम, तेरह, नाहोर, सरूग, रऊ, पेलेग, एबर, शेलह, केनान, अर्पक्षद, शेम, नोहा, लामेख, मथूशलह, हनोख, यारेद, महललेल, केनान, अनोश, सेथ आणि देवपुत्र आदाम.